Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Tuljabhavani temples 262 employees goes on strike at osmanabad

तुळजाभवानी मंदिरातील कंत्राटी कर्मचारी संपावर, ऐन दिवाळीत दोन महिन्यांचे वेतन दिले नाही

प्रतिनिधी | Update - Nov 07, 2018, 12:23 PM IST

स्वच्छतेसाठी मागणीनुसार कामगार पुरवण्याचे कंत्राट मुंबई येथील क्रिस्टल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे आहे.

 • Tuljabhavani temples 262 employees goes on strike at osmanabad

  तुळजापूर- तुळजाभवानी मंदिर संस्थानने सेवेत सामावून घेण्याचा मागणीसाठी तसेच ऐन दिवाळीत दोन महिन्यांचे वेतन दिले नसल्यामुळे तुळजाभवानी मंदिरातील सुरक्षा व स्वच्छतेसाठी नियुक्त 262 कंत्राटी कामगारांनी संपाचे हत्यार उपसले आहे. मंगळवारपासून (ता.6) कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. यामुळे मंदिरात गोंधळ उडाला आहे. कामगारांनी झुलत्या पुलावर धरणे दिले. मात्र, दिवसभरात कोणीही वरिष्ठ अधिकारी तिकडे फिरकलाच नसल्याने कामगारांनी सांगितले.

  तुळजाभवानी मंदिरात सुरक्षा तसेच स्वच्छतेसाठी मागणीनुसार कामगार पुरवण्याचे कंत्राट मुंबई येथील क्रिस्टल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे आहे. मा‍त्र, ऐन दिवाळीच्या तोंडावरच मंगळवारी सकाळपासून या कंपनीच्या कामगारांनी विविध मागण्यांसाठी अचानक काम थांबविल्याने गोंधळ उडाला आहे. त्यानंतर मंदिर संस्थानाने तातडीने हालचाल करत महत्त्वाच्य ठिकाणी कर्मचार्‍यांच्या नेमणुका केल्या. तसेच पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनीही मंदिरात भेट देऊन पाहणी केली. पोलिस कर्मचार्‍यांच्या नेमणुका केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

  या आहेत तक्रारी
  ऐन दिवाळीत गेल्या दोन महिन्यांपासून वेतन नाही, केवळ सहा हजार रुपये मासिक वेतनावर काम, पेमेंट स्लीप नाही, साप्ताहिक सुटी नाही, पीएफ किती कटतो, किती जमा होतो, याबाबत माहि देत नाहीत. पगाराविषयी विचारणा केल्यास दमदाटी करून कामावरून काढून टाकले जाते.

  दरम्यान, कामगारांनी मागण्‍यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना यापूर्वीच दिले आहे. मंदिरात सुरक्षा पुरुष कर्मचारी 150 व महिला 27, स्वच्छता कर्मचारी 7 व महिला 15 आहेत.

  कंपनीवर कारवाई करणार
  'मंदिर संस्थानाने तातडीने हालचार करत कर्मचारी नेमले. तसेच पोलिसांच्या नेमणुका करण्‍यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे. दरम्यान अचानक झालेल्या या प्रकारामुळे कंपनीवर करारातील अटी, शर्तीनुसार कारवाई करण्‍याचा निर्णय वरिष्ठ अधिकारी घेतील.'
  - दिलीप नाईकवाडी, धार्मिक व्यवस्थापक

Trending