आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- टीव्ही अॅक्ट्रेससोबत आक्षेपार्ह वर्तन करून तिला धमकी दिल्या प्रकरणी मुंबई पोलिसांत दोन मद्यपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्मिता जग्गी असे असे पीडित टीव्ही अॅक्ट्रेसचे नाव अाहे. तिने 1 मिनिट 54 सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून या प्रकरणाला वाचा फोडली आहे.
अंधेरी लिंक रोडवर सिटी मॉलजवळ शनिवारी (17 नोव्हेंबर) दोन मद्यपी आणि अश्मितामध्ये गाडी पार्किंगवरून बाचाबाची झाली. दोन्ही मद्यपींनी अश्मिताला अश्लील शिविगाळ केली. तिच्यासोबत आक्षेपार्ह वर्तन केले. एवढेच नाही तर तिला धमकीही दिली. यावेळी अश्मिताचा मित्रही उपस्थित होता. अश्मिताने ट्विटरवर या घटनेचा व्हिडिओ शेअर करून मद्यपींच्या वाहनाच्या नंबर प्लेट्सचा फोटो शेअर केले आहेत.
स्विम टीममधून केली करियरला सुरुवात..
अॅक्ट्रेस अश्मिता हिने आपल्या करियरला सुरुवात 2015 मध्ये टीव्ही सीरियल स्विम टीममधून केली होती. नंतर तिने टीव्ही जाहिरातीमधून काम सुरु केले होते. 'हम पांच फिर से' या सीरियलमध्येही ती दिसली होती. याशिवाय तिने एका वेब सिरीजमध्ये काम केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा.. संबंधित घटनेचे फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.