Home | Maharashtra | Mumbai | TV Atress debolina bhattacharya arrested in Guwahati diamond merchant murder case

टीव्हीवरील फेमस गोपी बहूला गुवाहटीमधून केले अटक, डायमंड मर्चेंट मर्डर केसमध्ये समोर आले नाव

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 07:22 PM IST

देवोलीना हिला सध्या घाटकोपरमधील पंत नगर पोलिस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

 • TV Atress debolina bhattacharya arrested in Guwahati diamond merchant murder case

  मुंबई- टीव्ही सीरियल 'साथ निभाना साथिया' फेम गोपी बहू अर्थात देवोलीना भट्टाचार्य हिला आसाम पोलिसांनी गुवाहाटीमध्ये अटक केली आहे. घाटकोपरमधील सराफा व्यापारी राजेश्वर किशोरीलाल उदानी यांच्या हत्येत हात असल्याचा देवोलीना हिच्यावर आरोप आहे.

  देवोलीना हिला सध्या घाटकोपरमधील पंत नगर पोलिस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. पोलिस तिची कसून चौकशी करत आहे. राजेश्वर उदानी हे 28 नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. 4 डिसेंबरला राजेश्वर यांचा मृतदेह पनवेल येथील जंगलात सापडला होता.

  राजेश्वर यांच्या मुलाने पोलिसांत केली होती तक्रार..
  - मिळालेली माहिती अशी की, घाटकोपर पश्चिमधील कामा लाईन येथील महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहणारे राजेश्वर किशोरीलाल उदानी (वय-57) 28 नोव्हेंबरपासून बेपत्ता होते.
  - 29 नोव्हेंबरला त्यांच्या मुलाने वडील बेपत्ता असल्याची तक्रार पंतनगर पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली होती.
  - 4 डिसेंबरला पनवेल पोलिसांना नेरे गावातील जंगलात एक मृतदेह आढळला होता.
  - सापडलेला मृतदेह राजेश्वर यांचा असल्याचे समोर आले होते.
  - कपडे आणि बेल्टवरुन राजेश्वर यांची ओळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले.

Trending