आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापूर लूट प्रकरणातील प्रमुख आरोपी निघाला पंतप्रधानांच्या गावचा..आरोपीकडून जप्त केले 51 लाख रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर- पिंपळनेर रस्त्यावर रायपूर जाम तलावादरम्यान रिव्हाॅल्वरचा धाक दाखवत व्यापार्‍याकडून 2 कोटी 41 लाख 50 हजारांची लूटले होते. प्रमुख आरोपी मेघराज दरबार (वय- 27) याच्या नवापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणातील प्रमुख देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ गाव वडनगर (जि. मैहसाणा) येथील आहे.

 

नंदुरबारच्या पोलिसांनी आरोपीला गुजरात राज्यातील मैहसाना जिल्ह्यातील वीसनगरमधून अटक केले. तो बसने अहमदाबादकडे जात होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक संजय पाटील, पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

 

पोलिसांनी प्रमुख आरोपीच्या अशा अावळल्या मुसक्या..

मेघराज दरबार याला दारु व गांजाचे व्यसन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, गुजरात राज्यातील दारु व गांजाचा विक्री करणारे लोकांना विश्वासात घेतले. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना मदत करणार्‍यास बक्षीस देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात दिले होते. आरोप‍ीवर पाळत ठेवण्यात आली होती. आरोपी रात्री आठ वाजेच्या सुमारास सुरत बसस्थानकवरून बसने अहमदाबादकडे निघाला होता. पहाटे तीनच्या सुमारास पोलिसांनी बसला अडवून आरोपीला अटक केली.

 

या कारवाईत गुजरात रराज्यातील पोलिस गुन्हे अन्वेषण विभागाचे राजेंद्र सिंग, निलेशभाई, मिनामा यांच्या मदतीने मुख्य आरोपीला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याचा खिशात 1 लाख 10 हजार रूपये सापडले. लुटीचे उर्वरित 50 लाख त्याच्या कर्दा गावातील एका शेतातील कडब्यात एका पिशवीत लपवले होते. आरोपीने स्वत: ते पैसे पोलिसांना काढून दिले. आरोपीला मैहसाणा पोलिसांत हजर करण्यात आलेे. त्यानंतर आरोपीला घेऊन पोलिस नवापूरकडे रवाना झाले आहे.

 

घटनेनंतर अवघ्या 12 तासांत चोरट्यांच्या हातात बेड्या..

रायपूर जामतलावाजवळ 11 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास व्यापार्‍याला रिव्हाॅल्वर व चाकू धाक दाखवून चोरट्यांनी त्याच्याकडून 2 कोटी 41 लाख 50 हजार रुपये लुटले होते. या घटनेनंतर अवघ्या १२ तासांत पोलिसांनी गुजरात राज्यातील मैहसाणा शहरातून एक कोटी 22 लाख 27 हजार 500 रूपये हस्तगत करत राजेंद्र कानाजी पटेल,(रा.गुडली लखपत भुज,)
अमरसिंग चैनाजी ठाकूर, (मगपूरा,मैहसणा), अक्षय शैलेश पटेल, (टीटोली सुरत), प्रकाश शांतीलाल पटेल, (टीटोली सुरत), दीपक कुमार हसमुख पटेल, (लक्ष्मीपूरा, उमाजी), हार्दिक गोविंद पटेल, (सुरत) या सहा आरोपी ताब्यात घेतले होते. मुख्य आरोपी फरार असल्याने नवापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या पथकाने मुख्य आरोपी धरपकड करून 51 लाख रुपये ताब्यात घेऊन अटक केली आहे.

 

आतापर्यंत लुटीचे एकूण 2 कोटी 41 लाख 50 हजार रूपयांपैकी दोन कोटी 38 लाख 50 हजार रूपये मिळाले असून महाराष्ट्र व गुजरात पोलिस उर्वरित 30 लाख रुपयांचा शोध घेत आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... पोलिस कारवाईचे फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...