आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात भरधाव होंडा सिटीने आठ जणांना उडविले...आजी-नातवाचा मृत्यू, 6 गंभीर जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- चंदननगर परिसरात बुधवारी रात्री भरधाव वेगात असलेल्या एका होंडा सिटी कारने रस्त्यावरून पायी जात असलेल्या आजी आणि नातवाचा जीव घेतला. कांताबार्इ साहेबराव सोनुने (61) व नयन रमेश पोकळे (11) अशी मृतांची नावे आहेत. दिलीप लोखंडे यांचा अपघातात हात मोडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

 

आरोपीचे नाव सौरभ जासूद (20) असे असून तो पुणे महापालिकेतील एका अधिकारी शशिकांत जासूद यांचा मुलगा आहे.

 

बुधवारी रात्री साडेआाठ वाजता चंदननगर परिसरात सातव्या दिवसाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सातव वस्तीमध्ये भरधाव वेगात आलेल्या एका होंडा सिटी कारचालकाने रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन वाहनांना धडक दिली आणि त्यानंतर कारने पायी जात असलेल्या आजी व नातवाला चिरडले. यात आजी कांताबार्इ यांचा जागीच, तर नातू नयनचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच दिलीप लोखंडे यांना कारची धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर कारचालक वाहन जागेवरच सोडून पळून गेला. मृत नयनचे वडील लष्करात जवान असून सध्या जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत आहेत. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी होंडा सिटी कार (एमएच 12 एलडी 1011) मधील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो...

बातम्या आणखी आहेत...