आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णवाहिका व दुचाकीची समोरासमोर धडक..दोन जागीच ठार, डांभुर्णी गावाजवळील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- तालुक्यातील डांभुर्णी गावाजवळ जळगाव मार्गावर दुचाकी व रुग्णवाहिकेची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. शुक्रवारी दुपारी 3 वाजता हा अपघात झाला. समाधान भावलाल कोळी व अंकुश शाम कोळी (दोघे रा. चांदसर, बुद्रुक ता. धरणगाव) अाी मृत तरुणांची नावे आहेत. रूग्णवाहिका गरोदर महिलेला घेऊन जळगावकडे जात होती.

 

मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील विदगाव- जळगाव रस्त्यावर डांभुर्णी–कोळन्हावी गावाच्या दरम्यान पेट्रोलपंप आहे. या पेट्रोल पंपाच्या पुढील वळनावर शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दुचाकी (एम.एच. ३९ बी. २२९३) जळगावहून डांभुर्णीकडे तर रूग्णवाहिका (एम. एच. १९ एम.९२९५) जळगावकडे जात होती. वळणावर दुचाकी व रूग्णवाहीका समोरासमोर धडकल्या. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघातानंतर रूग्णवाहिकाचे चालक गाडी सोडून पसार झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच कोळन्हावीचे गोटू सोळुंके, पोलिस पाटील कैलास पाटील, साकळीचे जगदिश मराठे, डांभुर्णीचे उपसरपंच समाधान सोळुंके यांनी अपघात स्थळी मदत कार्य केले. घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... रुग्णवाहिका आणि दुचाकीच्या अपघाताची भीषणता दर्शविणारे फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...