आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात सिलिंडरच्या स्फोटात पाच झोपड्या जळून खाक, तृतीयपंथीसह दोघांचा होरपळून मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पिंपरी-चिंचवडमधील दळवी नगर परिसरात सिलिंडरचा स्फोट होऊन पाच झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या आगीत तृतीयपंथीसह दोघांचा होरपळून मृत्यु झाला आहे. गुरुवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दळवीनगर झोपडपट्टीत सिलिंडरच्या गॅस गळतीमुळे भीषण आग लागली. आग एवढी भीषण होती की, पाच झोपड्या जळून खाक झाल्या. आगीत  दोघांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या चार बंबांच्या मदतीने आग विझविण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...