आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल तालुक्यातील किनगावमध्ये अतिसार सदृश्य लागण झाल्याने दोन जणांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- तालुक्यातील किनगाव येथे रविवारी अतिसार सदृश्य लागण झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. रात्रीपासून सकाळपर्यंत प्राथमिक बारोग्य केंद्रात सुमारे 50 हून जास्त रूग्ण उपचारार्थ दाखल झाले आहे तर काहींना जळगाव येथील जिल्हा रुग्णालवात हलविण्यात आले आहे.

 

गावात आरोग्य पथक, लोकप्रतिनिधी तळ ठोकून आहेत. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ज्या भागातील रूग्ण आहेत त्या भागात सार्वजनिक पाणी पुरवठा सह स्वच्छतेविषयी विशेष काळजी घेतली जात आहे. तसेच डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची सोमवारी आरोग्य केंद्रात लोकप्रतिनिधी व आरोग्य अधिकाऱ्यांनी बैठक घेत दक्षतेच्या सुचना करण्यात आल्या आहेत.


किनगाव येथे रविवारी सकाळ पासूनच अतिसार सदृश्य लागण झाल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काही जणांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते त्यातील नाना माधव साळुंखे (वय- 38) व दिलीप गेंदा साळुंके (वय- 50) या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघांना उलट्या व जुलाबाचा अचानक त्रास वाढला होता. तर रात्री नऊ वाजेला गावातील विशिष्ट दोन भागात मोठ्या प्रमाणावर नागरीकांना जुलाब व उलट्यांच्या त्रास सुरू झाला व गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणावर रूग्ण येण्यास सुरवात झाली. बघता बघता तब्बल 40 हुन अधिक जणांना येथे उपचार्थ आणण्यात आले या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली होती व मोठ्या संख्येत नागरीकांनी आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. त्यात अनेकांनी आरोग्य सेवे करीता आरोग्य केंद्रात उपस्थित डॉ. अनिल पाटील, डॉ. विघ्नेश्वर नायर यांना मदत केली. रात्रीच अनेकांनी जळगाव येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचार्थ हलवण्यात आले होते. जिल्हा परिषद सदस्या अरूणा रामदास पाटील, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष आर. जी. पाटील हे मदतीसाठी सरसावले. गावात पंचायत समितीचे उपसभापती उमाकांत पाटील, किनगाव खुर्द सरपंच भूषण पाटील, उपसरपंच शरद अडकमोल, सुरेश सोनवणे, प्रशांत पाटील गोपाल चौधरी, अनिल पाटील यांच्यासह नागरीकांनी आरोग्य केंद्रात मदत कार्यास हात लावला.

सोमवारी गावातून आरोग्य केंद्रात रूग्ण येणे सुरूच आहे. स्थिती नियंत्रणात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

 

मान्यवरांच्या भेटी व मदतकार्य...
सोमवारी सकाळी किनगाव आरोग्य केंद्रात उपस्थित राहून जिल्हाबँकेचे माजी उपाध्यक्ष आर. जी. पाटील, पंचासत समितीचे सदस्य हे सकाळपापून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. रात्री जिल्हा परिषदचे आरोग्य सभापती दिलीप पाटील, गटविकास अधिकारी वाय.पी. सपकाळे, विस्तार अधिकारी किशोर सपकाळे, तालुका वैद्यकिय अधिकारी हेमंत बऱ्हाटे यांनी भेट देवून पाहणी केली होती.

 

बैठक घेवून सूचना..

रूग्णालयात जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष आर. जी. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बबीता कमलापूर, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, गटविकास अधिकारी वाय. पी. सपकाळे यांनी स्थानिक डाॅक्टर, आरोग्य सेवक व कर्मचाऱ्यांची बैठक घेत त्यांन विशेष दक्षता घेण्या संर्दभात सूचना केल्या.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो...

 

 

बातम्या आणखी आहेत...