आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन तोतया सीबीआय अधिकार्‍यांच्या हातात बेड्या, एन्काउंटरची धमकी देऊन वसूल केली कोट्यवधींची खंडणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एन्काउंटर करण्‍याची धमकी देऊन कोट्यवधींची खंडणी वसून करणार्‍या दोन तोतया सीबीआय अधिकार्‍यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. अश्विनी शर्मा आणि साजिद वारेकर अशी आरोपींची नावे आहेत. बुधवारी सायंकाळी पोलिसांनी चारकोप भागात दोघांच्या मुसक्या आवळल्या.

 

काय आहे हे प्रकरण?
तपास अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित ठाकरे यांनी सांगितले की पीडित व्यक्तीची पत्नी एलआयसी एजेन्ट आहे. तिच्या पतीविरोधात पतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी सीबीआय चौकशी सुरु आहे. एका आरोपीने काही दिवसांपूर्वी स्वत:ला सीबीआय अधिकारी सांगत या दाम्पत्याशी मैत्री केली. पतसंस्थेतील घोटाळ्यात क्लिन चीट देण्याचे आश्वासन देऊन एक कोटी रुपये आणि इनोव्हा गाडीची मागणी केली. एवढेच नाही तर पैसे न दिल्यास पीडित व्यक्तीला इतर प्रकरणात अडकविण्यासोबत एन्काउंटर करण्‍याची धमकी दिली.

 

अशा आवळल्या आरोपींच्या मुसक्या...

या धमकीने पीडित दाम्पत्य घाबरले. त्यांनी 50 लाख कॅश व स्वत:ची इनोव्हा कार तोतया सीबीआय अधिकार्‍यांच्या ताब्यात ‍दिले. यानंतरही आरोपी पीडित दाम्पत्याला वारंवार धमकी देत होते. अखेर पीडित दाम्पत्याने डीसीपी संग्राम सिंह निशानदार यांची भेट घेऊन त्यांना आपबिती सुनावली. संग्राम सिंह निशानदार यांच्या आदेशानुसार एमएचबी पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. उर्वरित पैसे घेण्यासाठी पीडित दाम्पत्याने आरोपींना आपल्या घरी बोलावले. आरोपी चारकोप परिसरात पीडित व्यक्तीच्या घरी येतात पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.

बातम्या आणखी आहेत...