आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मर्सिडीझने बिहारहून मुंबईला यायचे..दिवसभर टेहळणी करून रात्री करायचे घरफोडी; थांबायचे आलिशान हॉटेलात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मर्सिडीझ कारने बिहार ते मुंबई प्रवास करून पंधरा दिवसांसाठी महागडे हॉटेल बुक करायचे. नंतर दिवसभर मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे शहरात बंद असलेले बंगले आणि आलिशान फ्लॅटची टेहळणी करायची. त्यानंतर रात्री ते घरफोडी करायचे. काही दिवसांपूर्वी लोणावळा परिसरातील रायवूड येथील कटी पतंग या बंगल्यात घरफोडी झाली होती. या प्रकरणाचा छडा लावताना बिहारच्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांनी दिल्लीसह मुंबईत घरफोड्या केल्याची कबुली दिली. 

 

इरफान अख्तर शेख (29, रा. जोगिया, ता. गाडा, जि. सीतामडी, बिहार) आणि मारुफ मतिउर अली (25, रा. बिहार) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. लोणावळ्यात 1 नोव्हेंबर रोजी दोघांनी कटी पतंग बंगल्याच्या मुख्य दरवाजाची काच फोडून बंगल्यात प्रवेश केला. त्यानंतर रोख रकमेसह महागडा माँट ब्लॅक कंपनीचा पेन असा एकूण सहा लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची कबुली दिली. याप्रकरणी आरोपींविरोधात लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींचा चेहरा व मर्सिडीझ कार निदर्शनास आली. त्याआधारे पोलिसांनी  सापळा रचून मर्सिडीझ कार (एचआर 26 बीएफ 786) मध्ये बसून संबंधित दोन आरोपी लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथे आले असता त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेण्यात आली. त्या वेळी त्यांच्याकडे घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य स्क्रू ड्रायव्हर, कटावणी, कटर तसेच रोख नऊ हजार रुपये सापडले. 

 

आरोपीची गरीब मुलींच्या लग्नासाठी मदत
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद गावंडे म्हणाले, आरोपी इरफान शेख याच्यावर नवी दिल्लीत यापूर्वी घरफोडीचे सात गुन्हे दाखल आहेत. सुरुवातीला आरोपी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात घरफोडी-चोऱ्या करत होते. दिल्लीत 25 लाख रुपयांची शेवटची घरफोडी करून आरोपींनी सेकंड हँड मर्सिडीझ कार विकत घेतली. त्यानंतर बिहारहून ते मुंबर्इत येऊन उच्चभ्रू हॉटेलचे १५ दिवसांचे बुकिंग करायचे. यादरम्यान, मुंबर्इ, नवी मुंबर्इ, ठाणे परिसरात दिवसभर टेहळणी करून बंद असलेले बंगले, फ्लॅटची पाहणी करून रात्री घरफाेडी करून पसार व्हायचे. अाराेपी इम्रान शेख हा चोरीचे पैसे मौजमजा केल्यानंतर काही रक्कम गावातील गरीब मुला-मुलींच्या लग्नासाठी द्यायचा.

 

बातम्या आणखी आहेत...