आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात घुसून महिलेवर झाडली गोळी..पतीभोवती फिरते आहे संशयाची सुई, पुण्यातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शहरातील चंदन नगर परिसरातील एकता नगरात एका महिलेची निर्घृण हत्या करण्‍यात आली आहे. दोन अज्ञात मारेकर्‍यांनी तिच्या घरात घुसून तिच्यावर गोळी झाडली. बुधवारी ही घटना घडली.

 

मारेकर्‍यांनी महिलेवर गोळी झाडली तेव्हा तिचा पती घरातच होता. मारेकर्‍यांनी त्याला काहीही केले नाही. मुले शेजारच्या खोलीत खेळत होते. त्यामुळे ते थोडक्यात बचावले. पोलिसांनी सोसायटीत बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज ताब्यात घेतले आहे.

 

एकता ब्रिजेश भाटी (38) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. आनंद पार्कमधील इंद्रायणी सोसायटी ही महिला कुटूंबासोबत राहात होती.

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ही घटना बुधवारी सकाळी 9 वाजता घडली. गोळी झाडल्याचा आवाजाने संपूर्ण सोसायटीत खळबळ उडाली.

 

मारेकर्‍यांनी अशी केली महिलेची हत्या...

महिलेचा पती ब्रिजेश याने पोलिसांनी सांगितले की, फ्लॅटचा दरवाजा उघडा होता. एकता हॉलमध्ये मुलाला जेवू घालत होती. त्याच वेळी चेहरा झाकलेले दोन मारेकरी घरात घुसले आणि त्यांनी एकता हिच्यावर गोळी झाडली.गोळी झाडल्याचा आवाज ऐकल्यानंतर ब्रिजेश आपल्या खोलीतून हॉलमध्ये आला तेव्हा एकता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

 

पतीभोवती फिरते आहे संशयाची सुई..

या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखा करत आहे. पोलिसांनी एकताच्या पतीवर संशय व्यक्त केला आहे. त्याचीही चौकशी सुरु आहे.

 

बातम्या आणखी आहेत...