आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक, एक गंभीर जखमी, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- किनगाव- गिरडगाव मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अपघात झाला. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमी मोहन सोनवणे यांचा उपचारादरम्यान जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

 

किनगाव-गिरडगावदरम्यान रस्त्यावर मोठा वाघोदा (ता.रावेर) येथील अनिल सीताराम वाघ (वय-45) हे यावलकडून चोपड्याकडे जात होते तर मोहन सोनवणे (वय-35, रा.पाडळसा, ता.यावल) हे किनगावकडून यावलकडे येत होते. दरम्यान दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात अनिल वाघ यांचा उजवा पाय मोडला तर मोहन सोनवणे यांना डोक्याला जबर दुखापत होऊन रक्तबंबाळ अवस्थेत ती बेशुद्ध रस्त्यावर पडले होते.

 

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पंचायत समितीचे उपसभापती उमाकांत पाटील, कोळ न्हावीचे गोटू सोनवणे यांच्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. दोन्ही जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे. मोहन सोनवणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... दुचाकी अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो..

बातम्या आणखी आहेत...