आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती नाईट ड्युटीवर.. पत्नीने दोन वर्षीय चिमुकल्याची तोंडावर उशी दाबून केली हत्या, नंतर ओढणीने लावून घेतला गळफास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज

पुणे- पोलिसाच्या पत्नीने आपल्या दोन वर्षांच्या मुलाचा खून करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. ही खळबळ जनक घटना मगरपट्टा, हडपसर येथे आज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासुरवासला कंटाळून तिने मुलाचा खून करुन आत्महत्या केल्याची चर्चा संबंधित परिसरात आहे. 

 

हडपसर पोलिस ठाण्यातील तपास पथकात काम करणारा पोलीस कर्मचारी अमित दत्तात्रय कांबळे यांची पत्नी जान्हवी अमित कांबळे हिने आपल्या अवघ्या दोन वर्षांच्या कोवळ्या शिवांश या मुलाचा खून करून, ओढणीच्या साह्याने फॅनला लटकून स्वतः आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली .आत्महत्येपूर्वी तिने लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये अमित (पती) तू माझ्यावर खूप प्रेम करतोस, मात्र वेळ देऊ शकत नाही, हे माझे दुर्दैव असे म्हटल्याचे आढळले.

 

यासंदर्भात पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, कांबळे हे रात्रपाळी संपवून पहाटे पाचच्या सुमारास घरी गेले. तेव्हा घराची खिडकी उघडी होती व बेडरुमची लाईटही सुरु होती. यामुळे त्यांनी घरात डोकवून पाहिले असता, त्यांना पूनमने गळफास घेतल्याचे व मुलाचा उशीने गळा दाबून खून केल्याचे लक्षात आले. त्यांना तेथे सुसाईड नोटसही सापडली. यासंदर्भात पूनमच्या नातेवाईकांनी सांगितले की, तीचा विवाह चार वर्षापूर्वी झाला होता. तिने अनेकदा फोन करुन सासूरवास होत असल्याची माहिती देत होती. मात्र परिस्थिती सुधारेल म्हणून तीची घरचे समजूत घालत होते. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक लोणारे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...