Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | Two Years Boy Killed in Chadrapur For Secret Money Two Godman Arrested

गुप्तधनासाठी चिमुकल्याचा बळी; दोन मांत्रिकांना अटक, चंद्रपूर जिल्ह्यातील घटनेने खळबळ

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 31, 2018, 07:32 AM IST

गुप्तधनाच्या लालसेपोटी दोन वर्षाच्या चिमुरड्याचे अपहरण करून त्याचा बळी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 • Two Years Boy Killed in Chadrapur For Secret Money Two Godman Arrested

  नागपूर- आठ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या दोनवर्षीय बालकाचा गुप्तधनासाठी नरबळी देण्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील खंडाळा गावी घडली आहे. याप्रकरणी प्रमोद (४३) आणि सुनील बनकर (३५) यांना अटक केली आहे.


  २२ आॅगस्ट रोजी युग अशोक मेश्राम खेळता खेळता बेपत्ता झाला. त्याच कुठेच शोध न लागल्याने पोलिसांत तक्रार दिली. बुधवारी प्रमोद बनकरच्या घराशेजारील गवताच्या गंजीखाली युगचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, सुनील आणि प्रमोद जादूटोण्याचा उपयोग करून गुप्तधनाच्या शोधात असतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले असता त्यांनी युगची नरबळीसाठी हत्या केल्याचे सांगितले.


  पोलिसांच्या मते, २२ ऑगस्ट रोजी आरोपींनी युगला उचलून नेऊन गावातीलच एका निर्जन झोपडीत बंद केले. त्याच झोपडीमध्ये २३ आॅगस्टच्या रात्री दोघांनी मंत्रोच्चारासह नरबळीसाठी अघोरी पूजा केली व युगचा बळी घेतला. युगचा मृतदेह नदीत फेकून देण्याची त्यांची योजना होती. मात्र, युगच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिस त्याचा शोध घेत होते. त्यासाठी गावात बंदोबस्त होता. त्यामुळे त्यांना मृतदेह फेकता आला नाही.


  शेवटी त्यांनी २७ ऑगस्टच्या रात्री गवताच्या गंजीखाली युगचा मृतदेह लपवला. परंतु, २९ ऑगस्ट रोजी त्या गंजीजवळ काही कोंबड्या टोचे मारताना आढळल्या. त्यावर संशय घेत तपास करण्यात आला तेव्हा ढिगाऱ्यात मृतदेह ताब्यात घेतला गेला.


  युगच्या डोक्यावर तीन भोवरे असल्यामुळे दिला नरबळी
  पोलिसांच्या मते, गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील मांत्रिकाने गुप्तधनासाठी बळी देण्याचा सल्ला प्रमोद व सुनील यांना दिला होता. त्यासाठी डोक्यावर तीन भोवरे असलेल्या बालकाची गरज होती. युगच्या डोक्यावर असे भोवरे आरोपींना दिसले. त्यांनी २३ आॅगस्टच्या रात्री नरबळीचे िवधी पूर्ण करून युगची गळा दाबून हत्या केली. यापूर्वीही त्यांनी युगचा अपहरणाचा प्रयत्न केला हाेता मात्र ताे यशस्वी झाला नव्हता.

Trending