आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदूंच्या भावना म्हणून शिवरायांच्या जन्मभूमीतील माती कलशात घेऊन अयोध्येला निघालोय- उद्धव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- छत्रपती शिवाजी महाराज तमाम हिंदूंचे दैवत शिवरायांच्या जन्मभूमीतील माती म्हणजे हिंदूंच्या भावना कलशमध्ये घेऊन अयोद्धेला निघालोय असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सांगितले. उद्धव यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 

माझ्यावर आरोप करणाऱ्या विरोधकांची कुवत काय, हे मला ठाऊक आहे. आणखी किती निवडणुकांमध्ये अजून हा मुद्दा घेणार आहात?, तेच विचारायला मी अयोध्येत निघालो आहे.
मी अयोध्येला प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी चाललो आहे. त्यामुळे मंदिर उभारणीच्या कार्याला वेग मिळेल, असे उद्धव यांनी सांगितले.


उद्धव ठाकरे म्हणाले की,  ही केवळ शिवनेरीची माती नाही तर तमाम हिंदूंच्या भावना आहेत"
महाराज ज्या भूमीमध्ये जन्माला आले, त्या ठिकाणीची माती घेऊन मी अयोध्येला निघालो आहे.

 

दरम्यान, अयोध्येला निघण्यापूर्वी उद्धव ठाकरे गुरुवारी पुण्‍यात पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावर त्यांनी विधिवत पूजन केले. शिवनेरी गडावरील माती कलशात भरली. मातीचा कलश ते आपल्यासोबत अयोद्धेला घेऊन जाणार आहेत.
 

शिवनेरी किल्ल्यावर झाला होता शिवाजी महाराजांचा जन्म..

 इ.स. 1627 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. बालपणी शिवाजी महाराज ज्या पाळण्यात खेळत होते, तो पाळणा आजही येथे आहे. शिवनेरी किल्ल्यावरच शिवरायांनी तलवारबाजीचे धडे घेतले होते.

बातम्या आणखी आहेत...