आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिरप्रकरणी कोर्टाकडे बोट दाखवणं थांबवा..झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करायला हवं- उद्धव ठाकरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राम मंदिरप्रकरणी कोर्टाकडे बोट दाखवणं थांबवा

मुंबई- दुष्काळाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेने सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे. झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करायला हवं, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला टोला लगावला. शिवसेना भवन येथे पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे यांची बैठक झाली. त्यानंतर उद्धव यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 

उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, राज्यात दुष्काळ असून सरकार त्याबाबत गंभीर दिसत नाही. उद्धव यांनी सेनेच्या मंत्र्यांना दुष्काळी भागाचे दौरे करण्याचे आदेश दिले आहेत. राम मंदिराच्या मुद्द्यावर उद्धव यांनी मोदी सरकारवर खोचक टीका केली. राम मंदिरप्रकरणी कोर्टाकडे बोट दाखवणं थांबवा, असे उद्धव यावेळी म्हणाले.

 

24 डिसेंबरला पंढरपुरात सभा

उद्धव ठाकरे येत्या 24  डिसेंबरला पंढरपुरात सभा घेणार आहेत. या सभेत उद्धव काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

गिरीश महाजनांसारख्या आरतीबाज लोकांपासून सावध राहा, मुख्यमंत्र्यांना सल्ला

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. महाजन यांच्यासारख्या आरतीबाज लोकांपासून सावध राहा, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

 

''महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी रस्त्यावर आहे व दैवी चमत्कार संचारलेले मुख्यमंत्री असतानाही बेळगावसह सीमा भागात मराठी माणूस चिरडला जात आहे. दैवी चमत्कारच आता सीमा प्रश्न सोडवू शकेल व ती ‘पॉवर’ आज फक्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे! गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने अंगारे–धुपारे उडवले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनवाले नरेंद्र दाभोलकर यांचा आत्माही आता सांगत असेल, माझे खुनी पकडू नका! मुख्यमंत्र्यांनी अशा आरतीबाज लोकांपासून सावध राहिले पाहिजे. ते आम्हाला व्यक्तिशः प्रिय आहेत म्हणून हा प्रपंच', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून महाजनांवर टीका केली आहे.

बातम्या आणखी आहेत...