आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी आणि दोन मुलांना ब्लू फिल्म दाखवून प्रस्थापित करत होता अनैसर्गिक संबंध; पुण्यातील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ताडीवाला रोड येथील एका नराधमाने आपल्या दोन मुलांनाच नदीत फेकण्याची धमकी देऊन त्यांच्यावर अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. तसेच पत्नीला ब्लू फिल्म दाखवून तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करीत होता अशी माहिती समाेर अाली आहे.

 

बंडगार्डन पोलिसांनी या नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याविरुद्ध पत्नीने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्याच्यावर भादवि कलम 377, 504, 506, 323 सह पॉस्को अॅक्ट 8 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा 25 वर्षांचा असून त्याची पत्नी 23 वर्षांची आहे. त्यांना 4 व 5 वर्षांची दोन मुले आहेत. तो गेल्या अडीच वर्षांपासून आपल्या पत्नीला ब्लू फिल्म दाखवून अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करत होता. त्याला विरोध केला असता तो शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत असे. तसेच त्यांच्या दोन मुलांना नदीत फेकून देण्याची धमकी देऊन अश्लिल कृत्य करत असे. याबाबत महिलेने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळून पुढील तपास महिला फौजदार चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

बातम्या आणखी आहेत...