आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवतीने पाण्याच्या बाटलीमधून माेबाइल नेत फाेडला यूपीएससीचा पेपर; 2 जणांविरुद्ध गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर-   नागपुरात रविवारी झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) कंबाइंड डिफेन्स  सर्व्हिसेस परीक्षेचा पेपर फुटल्याचे उघड झाले अाहे. परीक्षा केंद्रात मोबाइल बंदी असताना अश्विनी जनार्दन सरोदे (२३) या परीक्षार्थी तरुणीने चक्क पाण्याच्या बाटलीत लपवून मोबाइल आत नेला व त्याद्वारे प्रश्नपत्रिका फाेडली. केंद्राबाहेरील साथीदाराने तिला माेबाइलद्वारे उत्तरे पुरवल्याचा संशय अाहे. अश्विनी व तिचा साथीदार शुभम भास्करराव मुंदाने यांच्याविराेधात गुन्हा दाखल झाला. शुभमला अटक झाली अाहे.  


नागपूरच्या रेशीमबागेतील जामदार हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर रविवारी दुपारी यूपीएससी परीक्षा सुरू हाेती. अश्विनीने पाण्याच्या बाटलीत मोबाइल लपवून नेला. दुपारी १२ च्या सुमारास परीक्षा सुरू असताना तिने मोबाइल सुरू करून प्रश्नपत्रिकेचा फोटो काढला. केंद्राबाहेर उभ्या शुभमच्या माेबाइलवर तो पाठवला. त्याने हे प्रश्न पाहून माेबाइलवरच तिला उत्तरेही पाठवली. तिच्या झडतीनंतर हा प्रकार समोर आला.

 

या प्रकरणी वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर विनय दत्तात्रय निमगावकर (वय-51, रा. समर्थ नगरी, सोनेगाव) यांनी कोतवाली पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी अश्विनी तसेच शुभमविरुद्ध फसवणुकीचे कलम 420, 417, 34 तसेच सहकलम 43, 66 आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला.

 

बातम्या आणखी आहेत...