आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई/वॉशिंग्टन- मुंबई हल्ला प्रकरणी लष्कर-ए-तोयबा या संघटनेसह सर्व दोषींनी कायद्याच्या पकडीत आणावे, असा सल्ला अमेरिकेने पाकिस्तानला सल्ला दिला आहे. हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांना अटक करण्यासाठी आणि त्यांना शिक्षा व्हावी यासाठी महत्त्वाची माहिती देणाऱ्यास 50 लाख डॉलरचे (36 कोटी रुपये) बक्षीस दिले जाईल, अशी घोषणाही अमेरिकेने केली आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने रविवारी सायंकाळी परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांचे एक वक्तव्य जारी केले. त्यात म्हटले आहे की, अमेरिका सरकार आणि सर्व अमेरिकी नागरिक या प्रकरणात भारत आणि मुंबई महानगराच्या लोकांप्रती एकजूटता व्यक्त करतो. या निर्घृण हत्याकांडात प्राण गमावणाऱ्यांच्या नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. या हल्ल्यात अमेरिकेचे सहा नागरिक ठार झाले होते. मात्र, या हल्ल्याला 10 वर्षे उलटून गेली असली तरी ज्यांनी या हल्ल्याचा कट रचला, त्यांना त्यांच्या कुकृत्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले नाही ही एक विडंबनाच आहे. आम्ही सर्व देशांना विशेषत: पाकिस्तानला आवाहन करतो की,संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या जबाबदारीचे पालन करून लष्कर-ए-तोयबा आणि या संघटनेशी संबंधित इतर जबाबदार दहशतवाद्यांच्या विरोधात तत्काळ निर्बंध लागू करावेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.