आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हमारा बजाज आणि लिरिलसारख्या आकर्षक जाहिरातींचे निर्माता अॅलेक पदमसी यांचे निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्या शाहजहानसोबत अॅलिक पदमसी - Divya Marathi
कन्या शाहजहानसोबत अॅलिक पदमसी

मुंबई- अॅडगुरु आणि बॉलिवूड अॅक्टर अॅलेक पदमसी यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतले. अॅलेक यांच्या निधनामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला आहे.

 

अॅलेक यांनी 'हमारा बजाज', 'सर्फ', 'चेरी ब्लॉसम', 'शू पॉलिस', 'एमआरएफ मसल मॅन', 'लिरील गर्ल', 'फेअर अँड लव्हली' 'हँडसम ब्रँड' यासह अनेक आकर्षक जाहिरातींची निर्मिती केली होती.

अॅलेक पदमसी यांनी वयाच्या सातव्या वर्षी ‘द मर्चंट ऑफ व्हेनिस’ नाटकापासून आपल्या करियरला सुरुवात केली होती. 1982 मध्ये 'गांधी' चित्रपटात मोहम्मद अली जिना यांची व्यक्तीरेखा साकारली होती.

 

अॅलेक यांच्या या पाच जाहिराती झाल्या होत्या प्रसिद्ध

- 1989 मध्ये बजाज स्कूटरची ‘बुलंद भारत की बुलंद तस्वीर...हमारा बजाज’ या कमर्शियल जाहिरातीमागे अॅलेक यांचे डोके होते.  

- लिरिल साबणाची पहिली जाहिरात अॅलेक यांनी बनविली होती. या जाहिरातीचे शूटिंग महाराष्ट्रातील खंडळा आणि तमिळनाडुतील कोडाइकॅनालमध्ये झाली होती.
- 'सर्फ'चे ललिताजीची जाहिरात, चार्ली चॅपलिन यांच्या मूक-हास्य सिनेमांप्रमाणे चेरी ब्लॉसम शू पॉलिशची जाहिरात आणि एमआरएफचा मसलमॅनची जाहिरात अॅलेक यांनी बनविली होती.

 

300 रुपये पगारावर केली पहिली नोकरी
वयाच्या 19 व्या वर्षी पहिली पत्नी पर्लवर माझे प्रेम जडले होते. पर्लसोबत मला संसार थाटायचा होता. परंतु आई-वडील म्हणाले, नोकरी नसताना लग्न कसे करशील? त्यांनी जाहिरात क्षेत्रात पाऊल ठेवल्याचे अॅलेक यांनी 2016 मध्ये दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते. कॉपीराइटर म्हणून 300 रुपयांच्या पगारावर पहिली नोकरी केली होती.

 

अॅलेक पदमसी यांचे वडील जफरभाई आणि आई कुलसुमबाई गुजरातमधील खोजा मुस्लिम समुदायातील होते. अॅलिक यांचे बंधू अकबर पदमसी मॉडर्न आर्टीस्ट होते. पदमसी यांनी तब्बल 14 वर्षे अॅड एजन्सी लिन्टास इंडियाचे सीईओपद भूषविले होते.

 

थिएटरमध्ये बोमन इराणी यांना दिली पहिली संधी  
अॅक्टर बोमन इराणी यांनी अॅलेक पदमसी यांच्यानिधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. बोमन म्हणाले की, थिएटरमध्ये त्यांना पदमसी यांनी पहिली संधी दिली होती. अॅलेक हे स्वतंत्र विचारांचे होते.

बातम्या आणखी आहेत...