आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक-प्राध्यापक चोर, तर संस्थाचालक दरोडेखोर..विनोद तावडे अनेकदा खासगीत बोलले; अजित पवारांचा गौप्यस्फोट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती- राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गौप्यस्फोट केला आहे. शिक्षक-प्राध्यापक चोर तर संस्थाचालक दरोडेखोर असल्याचे तावडे यांनी आपल्याला अनेकदा खासगीत बोलल्याचे अजित पवार यांनी बारामतीत सांगितले. शिक्षकांच्या रिक्त जागा भरतीच्या मुद्द्यावरून पवार यांनी सरकारवर सडेतोड टीका केली. शिक्षकांबाबत सध्याचे सरकार उदासीन असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

 

बारामतीमधील मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या आर. एन. शिंदे सभागृह बहुउद्देशीय इमारतीचा पायाभरणी समारंभ अजित पवार यांच्या हस्ते पार पडला.

 

समृध्दी महामार्गाचे नावही आम्हीच ठरवणार तुम्ही बसा भांडत- पवार

समृद्धी महामार्ग तयार व्हायला अजून चार-पाच वर्षे लागतील. मात्र, त्यावरुन सरकारमधील मंत्री भांडत बसले आहेत. पुणे-मुंबई एक्स्प्रेस सुरु केला आणि उर्वरीत काम आम्ही पूर्ण केले आणि यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग असे नामकरणही केल्याची पवारांनी यावेळी आठवण करून दिली. समृध्दी महामार्गाचे नावही आम्हीच ठरवणार तुम्ही बसा भांडत, अशी मिश्कील टिप्पणीही अजित पवारांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...