आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हीलचेअरवरून जबरदस्तीने उठवून केली चेकिंग, मुंबई एअरपोर्टवर अधिकार्‍यांकडून दिव्यांग तरुणीसोबत गैरवर्तन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एका दिव्यांग तरुणीसोबत छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकार्‍यांनी गैरवर्तन केलेल्याचे समोर आले आहे. सीआयएसएफ महिला आधिकार्‍यांवर व्हीलचेअरवरून जबरदस्तीने उठवून तिची चेकिंग केल्याचा आरोप दिव्यांग तरुणीने केला आहे.

 

या प्रकरणी केंद्रीय उड्डयन राज्य मंत्री जयंत सिन्हा यांनी तक्रारकदार दिव्यांग तरुणीची माफी मागितली आहे. जयंत सिन्हा यांनी सीआयएसएफकडे स्पष्‍टीकरणही मागितले आहे. दुसरीकडे, सीआयएसएफने दिव्यांग महिलेचे आरोप फेटाळले आहेत. महिलेची तपासणीही नियमानुसार केल्याचे सीआयएसएफच्या सूत्रांनी म्हटले आहे.

 

विराली मोदी (27) असे आरोप करणार्‍या तरुणीचे नाव आहे. विरालीने यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. ती दिव्यांग असूनही एअरपोर्टवर तिच्यासोबत अधिकार्‍यांकडून गैरवर्तन करण्यात आले. विराली ही दिव्यांग महिलांसाठी कार्यरत आहे.

 

I’m traveling to London from Mumbai via @jetairways and I had the most horrible experience with the CISF staff. After scanning my wheelchair, this insensitive woman was forcing me to stand up, even when I told her repeatedly that I couldn’t. Pt. 1
— Virali Modi (@Virali01) November 26, 2018

 

Really sorry for the suffering that you went through @CISFHQrs @CSIAMumbai please follow up #AirSewa https://t.co/34aVKFf3Ni
— Jayant Sinha (@jayantsinha) November 27, 2018

 

सीआयएसएफचे असे दिले स्पष्‍टीकरण...
सीआयएसएफच्या सूत्रांनी सांगितले की, एअरपोर्टवर ड्युटीवर असलेली महिला अधिकारी, विराली यांच्याशी सभ्यतेनेच वागली. तिने विराली मोदी यांना कोणताही त्रास दिला नाही.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... विराली मोदी यांचे काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...