आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात पाण्यावरून जुंपले भांडण..फौजदाराच्या भाच्याने उपसली तलवार, व्हिडिओ व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शेतातून जाणार्‍या पाटाच्या पाण्यावरून दोन गटात भांडण जुंपले. यात पोलिस फौजदाराच्या भाच्याने चक्क तलवार उपसली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

पाण्यावरून एक तरुण हातात नंगी तलवार घेऊन काही लोकांना धमकावताना दिसत आहे. पाटाचे पाणी त्याच्या परवानगीशिवाय कोणीही घेऊ शकत नाही, अशी दहशत त्याने पसरवली आहे. फौजदाराच्या भाच्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, व्हिडिओ बुधवारी (ता.14) शूट करण्यात आला आहे. अमित पांढरे असे हातात तलवार असलेल्या तरुणाचे नाव आहे. तो इतर लोकांना धमकावताना दिसत आहे.

 

दरम्यान, सोलापूर जिल्हयातील करमाळा तालुक्यातील सावडी येथील कुकडी बंधार्‍यातून पाणी सोडण्यात आले आहे. परंतु अम‍ित पांढरे यांने पाटाचे पाणी त्याच्या शेतात वळवले आहे. या प्रकाराला इतर शेतकर्‍यांनी विरोध केल्यास त्याने हातात तलवार घेऊन त्यांना धमकावले. तिथे उपस्थित एका व्यक्तीने या घटना त्याच्याकडे असलेल्या मोबाइल कॅमेर्‍यात कैद केली. घटनेचा व्हिडिओ अमित पांढरे याच्या फौजदार मामाला पाठवला आहे. नंतर फौजदार मामाने इतर शेतकर्‍याची क्षमा मागून प्रकरण मिटवल्याचे समजते.

 

बातम्या आणखी आहेत...