आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिझनेस डेस्क - ईशा अंबानी आणि प्रियांका चोप्रा या दोघींच्या लग्नाचे कार्यक्रम राजस्थानी महालांमध्ये होणार आहेत. महालांमध्ये फक्त श्रीमंत आणि व्यावसायिक लोकांचेच लग्न होता असा अनेकांचा समज आहे. परंतु, सध्या जयपूर, उदयपूर या शहरांतील महालांमध्ये वेडींग प्लॅनर कमी बजेटमध्ये आणि थाटा-माटात लग्न लावून देत आहेत. तुम्हीही कमी बजेटमध्ये लग्नाचे ठिकाण, जेवण, डेकोरेशन, लाइटिंगची बुकिंग करु शकता. आम्ही तुम्हाला अशाच महालांबद्दल माहिती देत आहोत.
निमराना फोर्ट महाल
दिल्ली-एनसीआर परिसरात निमराना फोर्ट हा महाल पृथ्वीराज चौहान यांच्या तृतीय वंशाची राजधानी आहे. 1464 मध्ये याची निर्मिती करण्यात आली होती. 1192 मध्ये पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घौरीला पराभूत करुन हा किल्ला ताब्यात घेतला होता. या किल्ल्यात जवळपास 72 पेक्षा जास्त खोल्या असून सर्व खोल्यांना वेगवेगळी नावे आहेत. एका वेडिंग प्लॅनिंग कंपनीच्या सीईओंनी दिव्य मराठीला सांगितले, की एका लाखाच्या बजेटमध्ये एका रात्रीसाठी 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्यासाठी या महालाची बुकिंग करता येते. या महालात लग्नाचे सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी एकूण 10 लाखांचा खर्च येतो. तर फक्त एका रात्रीसाठी महाल बुक करुन लग्न करण्याचा खर्च- 3 ते 5 लाख रुपये आहे.
बुकिंग करण्याआधी या गोष्टींची काळजी घ्या
> हॉटेल आणि वेडिंग प्लॅनिंग कंपनींमध्ये करार असल्याने हेरिटेज हॉटेलमध्ये वेडिंग प्लॅनरच्या माध्यमातून लग्नासाठी स्वस्तात बुकिंग करता येते. वेडिंग प्लॅनिंग कंपनीच्या माध्यमातून स्वस्त बजेटमध्ये डेकोरेशन ते जेवणापर्यंत सगळ्या सुविधा दिल्या जातात. परंतु, तुम्ही थेट हॉटेलशी संपर्क साधल्यास तुम्हाला जास्त खर्च येऊ शकतो. नातेवाईकांची संख्या वाढल्यास खर्च वाढु शकतो. या पॅलेसमध्ये आधीच बुकिंग करावी लागते.
पुढील स्लाइडवर वाचा- राजस्थानमधील दुसऱ्या महालाबद्दल...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.