आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंडसोबत पतीला रंगेहाथ पकडले.. भररस्त्यावर बायकोने नवर्‍याची केली यथेच्छ धुलाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पती-पत्नीच्या भांडणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

नागपूर- पती-पत्नी और वो'चे किस्से तुम्ही अनेकदा ऐकले असतील. परंतु एखादी महिला आपल्या पतीला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडते, तेव्हा त्याचे काय हाल होतात. अशीच एक घटना उपराजधानी नागपूर शहरात घडली आहे.

 

भर रस्त्यावर पती-पत्नीच्या भांडणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक महिला तिच्या मुलासोबत मार्केटमध्ये येते. तिला पतीसोबत त्याच्या गर्लफ्रेंड फिरत असताना दिसते. ती क्षणात पती आणि त्याच्या गर्लफ्रेंडवर हल्ला चढविल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

 

महिलेच्या पतीचे विवाहबाह्य संबंध सुरु आहेत. पतीला मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलाला कडेवर घेऊन महिला पतीला खडेबोल सुनावताना दिसत आहे. नंतर तिने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पतीविरुद्ध तक्रारी दिली आहे.

 

विशेष म्हणजे यावेळी महिला एकटी नव्हती तर तिचे माहेरचे नातेवाईकही तिच्यासोबत होते. महिलेच्या भावाने मेव्हण्याला सोबत असलेल्या महिलेविषयी जाबा विचारला. या दरम्यान, महिलेने पतीच्या गर्लफ्रेंडसोबत गैरवर्तवणूक केली. त्यावरून वाद वाढतच गेला.

बातम्या आणखी आहेत...