कपाशीच्या शेतात विवाहितेची / कपाशीच्या शेतात विवाहितेची गळा आवळून हत्या; पतीचा वीज तारेला धरून आत्महत्येचा प्रयत्न

Nov 07,2018 04:19:00 PM IST

गंगापूर- गंगापूर तालुक्यातील मांजरी येथे सोमवारी दुपारी कपाशीच्या शेतामध्ये पतीने पत्नीचा साडीने गळा दाबून खून केला. त्यानंतर पसार होऊन राहाता येथे जाऊन वीज प्रवाह सुरू असलेल्या तारेला धरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

फकीराबादवाडी (ता. वैजापूर)येथील विजय अंबादास थोरात हा आपला जमीनजुमला विकून मांजरी येथील शेती घेऊन शेतवस्तीवर ४ महिन्यांपूर्वी स्थायिक झाला होता. सोमवारी दुपारी त्याने कपाशीच्या शेतामध्ये पत्नी ज्योती (32) हिचा तिच्या साडीने गळा दाबून खून करून पळ काढला. कुटुंबीयांनी रात्र झाली तरी ज्योती परत आली नाही म्हणून शोधाशोध केली असता तिचा मृतदेह कपाशीच्या शेतामध्ये आढळला. त्यावरून गंगापूर पोलिसांना रात्री साडेअकरा वाजता घटनास्थळावर जाऊन मृतदेह ताब्यात घेतला.

दरम्यान, विजय थोरात हा पकडल्या जाण्याच्या भीतीने नगर जिल्ह्यातील राहाता येथे पळून गेला. तेथे विजेचा प्रवाह सुरू असलेल्या तारेला पकडून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातून तो वाचला. पोलिसांनी त्याला लोणी येथील प्रवरा मेडिकल हाॅस्पिटलमध्ये दाखल केले आहे. मृत ज्योती ही त्याची दुसरी पत्नी होती. पहिल्या पत्नीने विहिरीत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

X