आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीच्या साईबाबांच्या पालखी सोहळ्यात महिलेचा विनयभंग;मंदिर अधिकाऱ्याविरोधात गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- साईबाबांच्या पालखी सोहळ्यात महिला भाविकाचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मंदिराचे अधिकारी राजेंद्र जगताप यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राजेंद्र जगताप सध्या फरार आहे.  आरोपीला तत्काळ निलंबित करण्‍याची मागणीही तक्रारदार महिलेने केली आहे.

 

काय आहे हे प्रकरण?

गुरुवारी रात्री साडेआठ वाजता साईबाबांचा पालखी सोहळा पार पडला. यावेळी महिला मंदिरात उभी होती. यावेळी मंदिराचे अधिकारी राजेंद्र जगताप यांनी आपला हात ओढत असभ्य वर्तन केलं आणि ढकलुन दिलं, असा आरोप महिलेने केला आहे. राजेंद्र जगताप नेहमीच गैरवर्तन केले, असे तक्रारदार महिलेने पोलिस तक्रारीत म्हटले आहे.

 

कोण आहेत राजेंद्र जगताप?

राजेंद्र जगताप हे मागील 25 वर्षांपासून साईबाबा संस्थानामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मंदिर प्रभारी म्हणून काम पाहिले आहेत. संस्थानाच्या कामगार सोसायटीचे ते आठ वर्ष चेअरमनही राहिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...