आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतंगाच्या मांजाने गळा चिरुन पुण्यात डॉक्टर तरुणीचा जागीच मृत्यू, 8 महिन्यांत दुसरी घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- दुचाकीवर जात असताना पतंगाचा मांजा गळ्यात अडकून एका डॉक्टर तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला. काल (रविवारी) नाशिक फाटा उड्डाणपुलावर ही घटना घडली.

 

कृपाली निकम (26) असे मृत डॉक्टर तरुणीचे नाव असून ती पिंपळे सौदागर या भागात राहाते. ती पुण्यातून भोसरीकडे जात असतानाही घटना घडली. नागरिकांनी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये ह‍लविले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

 

8 महिन्यांत दुसरी घटना...
पतंगाच्या मांजाने गळा चिरुन महिलेचा मृत्यू झाल्याची आठ महिन्यांत ही दुसरी घटना आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये एका मीडिया हाऊसमध्ये काम करणारी सुवर्णा मुजुमदार हीचा मृत्यू झाला होता. ती ऑफिसमधून घरी जात असताना तिच्या गळ्यात मांजा अडकला होता. मांजान सुवर्णाचा गळा कापला गेला होता.

 

देशात चाइनिज मांजावर बंदी..
नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने देशात चाइनिज मांजाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. परंतु तरी देखील देशातील जवळपास सर्वच शहरात खुलेआम चाइनिज मांजा विक्री होत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...