आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#MeToo: गँगरेप पीडितेने गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांच्यावर केला गैरवर्तनाचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीडितेवर 2017 मध्ये 7 नराधमांनी केला होता सामूहिक बलात्कार

 

मुंबई- बॉलीवड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तवणुकीचा आरोप केला असताना एका बलात्कार पीडितेने राज्याचे गृहराज्य मंत्री दीपक केसकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. महिलेने आरोप केला आहे की, तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर ती तक्रार घेऊन दीपक केसरकर यांच्याकडे गेली होती. मात्र, केसरकर यांनी तिला शिविगाळ करून हाकलून दिले होते.

 

महिलेवर 2017 मध्ये सामूहिक बलात्कार झाला होता. मात्र, पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने न घेता अनेक आरोपींची सूटका केली होती.

 
ड्रग्ज देऊन 7 जणांनी केला होता सामूहिक बलात्कार
पीडित महिलेने दीपक केसकर यांच्या विरोधात मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. पीडितेने सांगितले की, मे 2017 मध्ये सात नराधमांनी तिला ड्रग्ज देऊन तिच्यासह तिच्या मुलीवर बलात्कार केला होता. मात्र, या प्रकरणी पोलिसांनी केवळ एका आरोपीविरोधात तक्रार दाखल केली होते. उर्वरित सहा आरोपींवर कोणतीही कारवाई न करता त्यांची सूटका केली होती.

 

पीडितेने केले दीपक केसरकरांवर हे आरोप...
महिलाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत लिहिले आहे की, ती न्याय मिळण्यासाठी दीपक केसरकर यांच्याकडे गेली असता ते तिच्यावरच चिडले. 'तुझी औकात काय आहे मला माहीत आहे. जास्त बकबक करू नको.' असे म्हणत बंगल्यावरून हाकलून दिले होते.

बातम्या आणखी आहेत...