आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 नराधमांनी रात्री महिलेला फोन करून बोलावले घराबाहेर, नंतर पार केल्या क्रौर्याच्या सर्व सीमा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोतीहारी (बिहार)- बिहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 3 नराधमांनी एका नवविवाहितेचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. एवढेच नाही तर नराधमांनी तिच्या संपूर्ण शरीरावर चाकूने 50-60 वार केले. गंभीर जखमी महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

रात्री 3 वाजता फोन करून नवविवाहितेला बाहेर बोलवले..

पीडितेच्या सासर्‍यांनी यासंदर्भात कॅंप पोलिसांकडे तक्रार केली आहे. घटना 17 अॉक्टोबरला घडली. रात्री सर्व झोपले होते. तितक्यात नवविवाहितेच्या मोबाईलवर फोन आला. ती घराबाहेर निघाली. घराबाहेर उभ्या असलेल्या तीन तरुणांनी तिला बळजबरीने कारमध्ये बस‍वले. नंतर तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर तिच्या संपूर्ण शरीरावर चाकूने 50-60  वार केले. नंतर महिला बेशुद्ध झाल्यानंतर तिचा मोबाईल घेऊन नराधम पसार झाले, असे पीडितेच्या सासर्‍यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

 

गावकर्‍यांना शेतात जखमी अवस्थेत आढळली पीडिता...

गावकर्‍यांना  शेतात जखमी अवस्थेत पीडिता आढळून आली. याबाबत तिच्या घरच्या मंडळीना सूचना देण्यात आली. पीडितेला रुग्णालयात दाखल करण्‍यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

 

पीडितेने सांगितले की, रात्री 3 वाजेच्या सुमारास घरात मांजरी घुसली होती. तिला बाहेर काढण्यासाठी तिने घराचा दरवाजा उघडला होता. तितक्यात बाहेर उभ्या असलेल्या तीन तरुणांनी बळजबरीने तिला कारमध्ये बसविले. नराधमांनी गाडी अज्ञात ठिकाणी नेली. त्यानंतर काय झाले हे माहित नसल्याचे ती म्हणाली.

 

महिलेवर बलात्कार झाल्याची तक्रार तिच्या सासर्‍यांनी दिली आहे. या प्रकरणी पकडीदयाल, शिकारगंज व महिला पोलिस स्टेशनला देण्यात आली आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्‍यात येणार  असल्याचे जिल्हा हॉस्पिटलचे कॅंप प्रभारी भरत राय यांनी सांग‍ितले आहे.

बातम्या आणखी आहेत...