Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | woman molestation in Yawal Chincholi

यावल: चिंचोली येथे क्षुल्लक कारणावरून म‍हिलेचा विनयभंग..वयोवृद्ध सासूला जबर मारहाण

प्रतिनिधी | Update - Nov 09, 2018, 12:59 PM IST

घरात घुसून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिचे अंगावरी कपडे फाडले. मनाला लाज निर्माण होईल, असे कृत्य केले.

  • woman molestation in Yawal Chincholi

    यावल- चिंचोली येथे लहान मुलीस बकरीच्या पिलाने धक्का दिल्याने झालेल्या वादात एका महिलेचा विनयभंग तसेच तिच्या सासूला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी यावल पोलिस स्टेशनमध्ये तीन जणांविरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    चिंचोली (ता. यावल) येथील पीडित विवाहितेने सांगितले की, 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांची मुलगी घराबाहेर खेळत होती. आरोपी भूषण भानुदास कोळी, रेखा भूषण कोळी, मंगलाबाई भानुदास कोळी यांच्या बकरीच्या पिलाने मुलीस धक्का दिला. मुलगी जमिनीवर पडली. याबाबत जाब विचारण्यास पीडित महिला गेली असता आरोपींनी तिच्याशी वाद घातला. एवढेच नाही तर तिच्या घरात घुसून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिचे अंगावरी कपडे फाडले. मनाला लाज निर्माण होईल, असे कृत्य केले. तिच्या सासूलाही जबर मारहाण केली. या मारहाणीत पीडित महिला बेशुद्ध झाली होती. तिच्यावर जळगाव जिल्हा वैद्यकीय शासकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरु होते. शुद्धीवर आल्यावर सदर विवाहितेने गुरुवारी सायंकाळी यावल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

    या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, हवालदार संजय तायडे यांच्याकडे घडलेल्या घटनेची फिर्याद दिली. तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार सुनील तायडे, विकास सोनवणे करत आहेत.

Trending