आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॉरेनर बनून मोबाईल शॉपीत आल्या दोन महिला..असा लांबवला काउंटरवरील महागडा स्मार्टफोन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुलुंड येथील एका मोबाईल शॉपमध्ये स्वत:ला फॉरेनर असल्याचे सांगून दोन महिला आल्या. काउंटरवर ठेवलेला एक महागडा मोबाईल त्यांनी लांबविला. ही घटना शॉपमध्ये बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

 

नेमके काय आहे हे प्रकरण??

मुलुंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुलुंडमधील फडके रोडवरील नील टेलिकॉम सेंटरमध्ये ही चोरी झाली. सोमवारी (24 सप्टेंबर) सकाळी दोन महिला मोबाइल शॉपमध्ये आल्या. आपण विदेशी नागरिक असल्याचे दोन्ही महिलांनी दुकान मालक प्रकाश लोहार यांना सांगितले. मनी एक्सचेंज करण्याबाबत त्यांनी लोहार यांच्यासोबत चर्चा केली. नंतर सेल्सगर्लला त्यांना एक मोबाईल फोन दाखविण्यास सांगितले. सेल्सगर्ल फोन काढण्यासाठी गेली असता एका महिलेने टेबलवर ठेवलेला फोन हळून उचलून बॅगेत टाकला. नंतर सेल्सगर्लने दाखवलेले फोन पसंत न आल्याचे सांगून पोबारा केला.

 

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, त्यात दोन महिला दिसत आहेत. पोलिस दोघींचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...