आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेश्याव्यवसायाच्या संशयावरुन औरंगाबादेत महिलेला मारहाण, दाम्पत्यावर गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वेश्याव्यवसायाच्या संशयावरून नारेगाव परिसरातील एका महिलेला व तीच्या लहान मुलाला मारहाण करण्यात आली. 20 नोव्हेंबर रोजी दुपारी rhड वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी नारेगावातच राहणाऱ्या सलीम नामक तरुण व त्याच्या पत्नी विरोधात एमआयडिसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

 

आरोपी दाम्पत्याने दुपारी दीड वाजता तक्रारदार महिलेच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर वेश्याव्यवसायाचा आरोप करत मारहाण केली. मध्ये आलेल्या तीच्या लहान मुलालाही मारहाण केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक शेख अर्शद पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...