आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी महिलेची आत्महत्या..गायीच्या गोठ्यात सरण रचून स्वतःला घेतले पेटवून; बुलडाण्यातील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- एका शेतकरी महिलेने स्वत:च सरण रचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिखली तालुक्यातील धोत्राभांगोजी या गावात 14 नोव्हेंबरला रात्री ही घटना घडली आहे. आशाबाई दिलीप इंगळे असे मृत महिलेचे नाव आहे. आशाबाई यांनी गायीच्या गोठ्यात लाकडे रचून त्यावर पांघरुण टाकून त्यांनी स्वतःला पेटवून घेतले. सततची नापिकी आणि दुष्काळामुळे आशाबाई यांनी जीवनयात्रा संपविल्याचे बोलले जात आहे.

 

शेजारच्यांनी वाचविण्याचा केला प्रयत्न.. पण,

आशाबाई इंगळे 14 नोव्हेंबरच्या रात्री गोठ्यात गेल्या स्वतःचे सरण रचले आणि स्वत:ला पेटवून घेतले.  ही बाब शेजाऱ्यांना समजली असता त्यांनी आशाबाईंना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही.

 

डोक्यावर बँकेचे 80 हजार रुपयांचे कर्ज... खासगी देणेही थकली

आशाबाई यांच्यावर जिल्हा सहकारी बँकेचे 80 हजार रुपयांचे कर्ज आहे. तसेच खासगी देणे थकली आहेेत. आशाबाई यांच्याकडे साडेतीन एकर शेती असून त्यांना दोन मुले आहेत. ही दोन्ही मुले मोलमजुरी करतात. एका मुलीचे लग्न झाले आहे. पती दिलीपराव इंगळे यांचे 2008 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. याप्रकरणी अमरापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...