आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना पाटेकरांना बेड्या ठोका, महिला काँग्रेस तनुश्रीच्या समर्थनात महिला काँग्रेस उतरली रस्त्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महिला काँग्रेस आता बॉ‍लीवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या समर्थनात रस्त्यावर उतरली आहे.  महिला कार्यकर्त्यांनी थेठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या अटकेची मागणी केली आहे. तनुश्री दत्ताने ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये नाना पाटेकर यांच्यासह दिग्दर्शक राकेश सारंग, कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि निर्माते सामी सिद्दीकी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

तनुश्रीने आरोप केला आहे की, 2008 मध्ये ती ‘हॉर्न ओके प्लीज’च्या एका गाण्याची शूटिंग करत असताना नाना पाटेकरांनी तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता.

 

मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले की, पाटेकर आणि त्यार आरोपींविरोधात भादंवि 354 (छेडछाड) आणि 509 (महिलेस लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे कृत्य करणे) नुसार गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. या प्रकरणी पोलिस तपास सुरु असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आले नाही.

 

महिला आयोगाने बजावली नोटिस..

तनुश्री दत्ताच्या लेखी तक्रारीची दखल घेत राज्य महिला आयोगाने नाना पाटेकर यांना नोटीस बजावली होती. तनुश्रीच्या तक्रारीत उल्लेख असलेल्या नाना पाटेकरांसोबत गणेश आचार्य, सामी सिद्दीकी, राकेश सारंग यांना आयोगाने नोटीस बजावली असून 10 दिवसांत आपले म्हणणे आयोगाकडे मांडण्याचे निर्देश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...