Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Women Died in Truck Accident in Yawal

यावलमध्ये अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावरील अतिक्रमणाने घेतला वयोवृद्ध महिलेचा बळी

प्रतिनिधी | Update - Nov 06, 2018, 04:51 PM IST

भुसावळच्या तापी पुलावर जिजाबाई यांची प्राणज्योत मालावली.

 • Women Died in Truck Accident in Yawal

  यावल- शहरातील बुरुज चौकात अतिक्रमणाने एका वयोवृद्ध महिलेचा बळी घेतला आहे. रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला ट्रकने जोरदार धडक दिली. यात महिला गंभीर जखमी झाली. उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले. मात्र, वाटेतच तिची प्राणज्योत मालवली. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. जिजाबाई शांताराम पाटील (वय-75, रा. सुंदर नगरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ऐन दिवाळी पाटील कुटुंबावर शोककळा पसरली आहे

  यावल शहरातून बुरूज चौकातून चोपड्याकेडे केळीने भरलेला ट्रक (यू.पी. 76 के. 9245) जात होता. दुपारी एक वाजेच्या सुमारास जिजाबाई या रस्ता ओलांडत होत्या. दरम्यान या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना 108 वाहनाद्वारे डॉ. वसीम शेख व चंद्रकांत ठोके यांनी उपचाराकरिता जळगाव येथे हलविले. मात्र, भुसावळच्या तापी पुलावर जिजाबाई यांची प्राणज्योत मालावली.

  पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. दिवाळीत जिजाबाई यांचे अपघाती निधन झाल्याने पाटील यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर..

  बुरुज चौकातील अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम पुढाकार घेणार का? असा संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. अपघाताचे फोटो..

 • Women Died in Truck Accident in Yawal
 • Women Died in Truck Accident in Yawal
 • Women Died in Truck Accident in Yawal

Trending