आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्गा देवी मंदिरात आली महिला..पूजा करून लांबविली दानपेटी; मुंबईतील घटना कॅमेर्‍यात कैद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काशी मीरा भागात विजय पार्क कॅम्पसमधील दुर्गा देवी मंदिरात एका महिले चक्क दान पेटीच चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. चोरीची घटना मंदिरात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. ।

 

चोरी करण्‍यापूर्वी महिलेने केली देवीची पूजा..

व्हिडिओत एक महिला दिसत आहे. ती मंदिरात येते. देवीची पूजा करते. दानपेटीत काही पैसेही टाकते. नंतर दानपेटी एका मोठ्या पिशवीत ठेऊन पोबारा करते.

 

याप्रकरणी सोटायटीच्या अध्यक्षांनी काशी मीरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात महिलेच्या विरोधात तक्रार दिली आहे. राजू वैध यांनी सांगितले की, चोरटी महिला सोसायटीत काम करते. लवकरच तिची ओळख पटेल. पोलिस सीसीटीव्ही फुटेज पाहून पुढील तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...