Home | National | Other State | women trying to enter spreaded in sabarimala temple kerala

सबरीमाला मंदिराकडे गेलेल्या 52 वर्षीय महिलेला 200 हून जास्त अय्यप्पा भक्तांनी घेरले

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 06, 2018, 07:06 PM IST

मंदिर परिसरात आंदोलक भक्तांचा व्हिडिओ तयार करणाऱ्या एका मल्याळम वाहिनीच्या कॅमेरामनवर जमावाने हल्ला चढवला.

 • women trying to enter spreaded in sabarimala temple kerala

  सबरीमाला- केरळच्या सबरीमाला येथील अय्यप्पा मंदिरात मंगळवारी दर्शनासाठी आलेल 52 वर्षीय एका महिलेस 200 हून जास्त भाविकांनी घेरले. दीर्घकाळ चाललेल्या या गोंधळात पोलिसांनी महिलेच्या वयाची सत्यता पडताळून पाहिली व भाविकांना शांत केले. आपल्या 19 नातेवाइकांसह दर्शनास आलेली महिला पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मंदिरात जाऊ शकली. या घटनाक्रमानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने महिलेस रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेच्या एक दिवस आधी 30 वर्षीय महिलेला अय्यप्पा भक्तांच्या रोषामुळे माघारी परतावे लागले होते.

  मंदिर परिसरात आंदोलक भक्तांचा व्हिडिओ तयार करणाऱ्या एका मल्याळम वाहिनीच्या कॅमेरामनवर जमावाने हल्ला चढवला. शेकडो लोकांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी कॅमेरामन विष्णू एका इमारतीच्या बाल्कनीवर चढला. या दरम्यान काही लोकांनी त्यांच्यावर प्लास्टिकचे स्टूल फेकले. या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल नाही.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित घटनेचे फोटो..

Trending