आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाणीत काम करणार्‍या मजुराला सापडाला 42.59 कॅरेटचा हिरा...किंमत 2 कोटी रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पन्ना- खाणीत काम करणार्‍या एका मजुराला मंगळवारी 42.59 कॅरेटचा हिरा सापडला आहे. या हिर्‍याची किंमत 2 कोटी रुपये सांगण्यात येत आहे. मोतीलाल प्रजापती असे या मजुराचे नाव असून त्याने नियमानुसार सपडलेला हिरा सरकारकडे जमा केला आहे. हिर्‍याचा लिलावानंतर 13.5 टक्के रॉयल्टी वजा करून उर्वरित रक्कम मोतीलाल प्रजापती यांना देण्यात येणार आहे.

 

मोतीलाल प्रजापती यांनी सांगितले की, पन्ना शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या पटी येथे हिर्‍याची खाण आहे. दीड महिन्यापासून खोदकाम सुरु होते. मंगळवारी काम करताना एक हिरा सापडला. सापडलेला हिरा 42.59 कॅरेटचा निघाला. पन्ना जिल्ह्यातील इतिहासात हिरा सापड्याची दुसरी घटना आहे. यापूर्वी 1961 मध्ये रसूल मोहम्मद नामक मजुराला 44.55 कॅरेटचा हिरा सापडला होता. 

 

हिर्‍याची मिळणारी रक्कम आई-वडिलांची सेवेत खर्च करणार असल्याचे मोतीलाल याने सांगितले. मुलांना चांगले शिक्षण देण्याचीही इच्छा मोतीलाल याने व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...