आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 7 सवयींनी ओळखा इंटेलिजंट माणूस..मॉडर्न सायन्सनेही केले आहे मान्य, यापैकी आपल्यात किती?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाईट सवयी असलेले लोक इंटेलिजंट असतात
मित्रांनो, वाईट सवयी असलेले लोक इंटेलिजंट असतात, हे मॉडर्न सायन्सने मान्य केले आहे. हे पचविणे तुम्हाला जरा कठीण असेल. मात्र, हे सत्य आहे. इंटेलिजंट लोक त्यांच्या इतर सहकार्‍यांपेक्षा असे वेगळे काय करतात, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. इंटेलिजंट लोकही वाईट सवयींच्या आहारी गेले असतात. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे, या वाईट सवयीमुळेच इंटेलिजंट लोक मेंदू वॉश करत असतात. त्यामुळेच ते जगावेगळा विचार करतात.


कसे असतात इंटेलिजंट लोक?
एका रिसर्चमध्ये इंटेलिजंट लोकांच्या वाईट सवयी समोर आल्या आहेत. त्या बदलण्याचा प्रयत्न केला तरी आपण त्या बदलू शकत नाही. चला तर मग जाणून घेऊ या नेमक्या कोणत्या आहेत या वाईट सवयी. अरे हो, या सवयी कदाचित तुमच्यातही असू शकतात.

 

शपथ घेण्याची सवय..
प्रत्येक गोष्टीत शपथ घेणार्‍या व्यक्तीपासून लांब राहावे, त्यांच्यावर विश्वास ठेऊ नये, असे म्हटले जाते. अशी व्यक्ती स्वत:चा बचाव करण्यासाठी शपथ घेत असतात. परंतु नुकत्याचा झालेल्या एका रिसर्चमध्ये काही वेगळेच समोर आले आहे.

 

रिसर्चनुसार, अत्यंत छोट्या-छोट्या गोष्‍टींवर शपथ घेणारे लोक चाणक्ष असतात. त्याची बुद्धीमत्ता तल्लख असते. त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांचे वर्तन इतर सहकार्‍यांपेक्षा निश्चितच वेगळे असते.

 

रात्रींचे सौदागर..
याचा अर्थ असा की, असे लोक रात्री लवकर झोपत नाहीत. घडाळ्यात 10 वाजत नाही की, त्यांना महत्त्वाची कामे आठवतात. मात्र, वडीलधारी मंडळी सांगतात की, रात्री लवकर झोपणारे आणि सकाळी लवकर उठणारे लोक समझदार असतात. मात्र, वडीलधार्‍यांचा हा विचार आता मागे पडला आहे.

 

आयक्यू
एका रिसर्चनुसार, ज्या लोकांचा आयक्यू 75 च्या जवळपास असतो ते लोक रात्री 11 वाजेआधीच झोपी जातात. परंतु ज्यांचा आयक्यू 125 पेक्षा जास्त असतो अशा लोकांना रात्री 1 वाजेआधी झोप येत नाही.

 

ही पण आहे एक वाईट सवय..
इंटेलिजंट लोकांच्या खोलीत कधी जाऊ नये, कारण यांच्या खोलीतील सामान कायम अस्ताव्यस्त पडलेला दिसतो. अशी लोक प्रचंड आळशी असतात. ते कधीच खोली आवरत नाहीत. रिसर्चनुसार, आपल्या आजुबाजूला पसरलेल्या वस्तुंमुळे जरा हटके विचार करण्याची क्षमता वाढते. हे वाचायला विचित्र वाटत असेल, परंतु हे सत्य आहे.

बातम्या आणखी आहेत...