आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुदद्वारात प्रेशरने भरली हवा.. पोट फुगून कामगाराचा मृत्यू; CCTV फुटेजमुळे गंभीर प्रकार उजेडात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- थट्टा मस्करीने गुदद्वारात हवा भरल्याने हातकणंगले तालुक्यात एका तरुण कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे. ही घटना अतिग्रे येथील फौन्ड्री कारखान्यात घडली आहे. आदित्य दत्तात्रय जाधव असे मृत कर्मचार्‍याचे नाव असून ही घटना 3 सप्टेंबर रोजी घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

 

या प्रकरणी शाहुपूरी पोलिसांनी फौन्ड्री कारखान्यातील संशयित सुपरवायझरवर गुन्हा दाखल केला.

 

मिळालेली माहिती अशी की, आदित्य हा कोल्हापूर-सांगली रोडवरील अतिग्रे येथील फौन्ड्री कारखान्यात कामाला होता. आदित्य काम करत असताना सुपरवायझर त्याची थट्टा मस्करी करत होता. सुपरवायझरने आदित्यच्या गुदद्वारात प्रेशरने हवा भरली. आदित्य जमिनिवर कोसळला. बेशुद्धावस्थेत त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरु असतानाच त्याचा काल (बुधवारी) मृत्यू झाला.

 

आदित्यचे दहावीपर्यंत शिक्षण झाले होते. आई-वडील शेती करतात. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने तो अतिग्रे इथल्या एका फौन्ड्री कारखान्यात कामाला जात होता. 3 सप्टेंबर रोजी तो नेहमीप्रमाणे रात्री ड्युटीवर गेला होता. मध्यरात्री तीनच्या सुमारास काम सुरु असताना आदित्य संबंधीत सुपरवायझरजवळ आला. यावेळी त्याने आदित्यची थट्टा मस्करी केली. त्याच्या केसांवर, कपड्यांवर हवा मारली. एवढेच नाही तर त्याने आदित्यच्या गुदद्वारात प्रेशरने हवा सोडली. आदित्य अचानक जमिनीवर कोसळला. हे पाहून सुरपवायझरही घाबरला. मात्र त्याने कोणताही गाजावाजा न करता त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु आदित्य निपचीत पडला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेनंतर सुपरवायझर बेपत्ता आहे.

बातम्या आणखी आहेत...