आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे स्थानकातून बाहेर निघत होती बस...तरुणाने घेतली बसच्या चाकाखाली उडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे/ पारोळा- शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवाराबाहेर बसच्या चाकाखाली स्वत:ला झोकून देत तरुणाने आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी सकाळी पावणेदहा वाजता घडला. भूषण साळवे- शिंपी (रा. पारोळा) असे या तरूणाचे नाव आहे. अार्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. 


असा आहे व्हिडिओ 
परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये आत्महत्येची घटना कैद झाली आहे. सुमारे दोन मिनिटे चार सेकंदांचा हा व्हिडिओ आहे. सकाळी नऊ वाजून ४४ मिनिटांनी ही घटना घडली आहे. त्यामध्ये लांब अंतरावर उभा असलेला भूषण दिसतो. बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या एका बसखाली भूषण उडी घेण्याचा प्रयत्न करून मागे वळतो. त्यानंतर अकरा सेकंदांनी दुसरी बस येते. तिच्या डाव्या बाजूच्या चाकाखाली भूषण स्वत:ला झोकून देतो. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... थरारक घटनेचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...