- मुक्ता बर्वे, शरद पोंक्षे अभिनित ‘बंदिशाळा’ या नवीन चित्रपटाच्या प्रथमच प्रदर्शन
प्रतिनिधी
Dec 22,2018 05:38:00 PM ISTपुणे- चित्रपट रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण करणाऱ्या आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त प्रख्यात आसामी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक जानू बरूआ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यानिमित्त देण्यात येणारा ‘झेनिथ एशिया सन्मान’ यंदा ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती आशय फिल्म क्लबचे प्रमुख आणि आशियाई चित्रपट महोत्सवाचे संयोजक सतीश जकातदार आणि वीरेंद्र चित्राव यांनी शनिवारी दिली.
नवसिनेमाचे प्रणेते कुमार साहनी यांच्या हस्ते पालेकर यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. २५ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता, अर्काइव्ह थिएटर, लॉ कॉलेज रोड, पुणे येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
आशियाई चित्रपट महोत्सवाचे वैशिष्ट्य
- 15 वर्षांत मराठीत 50 चित्रपट निर्माण करणारे दिग्दर्शक म्हणून परिचित असलेले गजेंद्र अहिरे यांचा विशेष सन्मान
- काझीम ओझ दिग्दर्शित ‘झेर’ हा तुर्की चित्रपट उद्घाटनाचा चित्रपट
- चार नवीन इराणी चित्रपटांचे प्रदर्शन
- आशियाई चित्रपट महोत्सवाचा समारोप प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सुबोध भावे आणि आशियाई फाउंडेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम यांच्या प्रमुख उपस्थितीत
- चित्रपट महोत्सवाची सांगता मिलिंद लेले दिग्दर्शित आणि मुक्ता बर्वे, शरद पोंक्षे अभिनित ‘बंदिशाळा’ या नवीन चित्रपटाच्या प्रथम प्रदर्शनाने होणार आहे.