आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडाडीची कार्यकर्ती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं. लग्नापूर्वी  त्या अनेक सामाजिक चळवळींमध्ये  कार्यरत होत्या. त्याचे पती आयएएस अधिकारी होते. शीला यांना माहेराहून राजकारणाची फारशी पार्श्वभूमी नसली तरी त्यांचे सासरे राजकारणात कार्यरत होते. विवाहानंतर राजकारणात उतरलेल्या शीला १९८४ ते १९८९ या काळात खासदार आणि केंद्रात मंत्री होत्या. एका राज्याच्या तब्बल पंधरा वर्षे मुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या त्या एकमेव महिला होत्या. शिवाय संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला आयोगातही त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.  शीला यांनी राजकारणातील आणि आयुष्यातील अनेक चढ-उतार अनुभवले. शेवटच्या  दिवसात वयोमानानुसार आजारपणामुळे त्या थकल्या असल्या तरी शेवटच्या क्षणापर्यंत त्या कार्यरत होत्या. लोकसभा निवडणुकांमधे पराभव पचवूनही त्यांनी हार मानली नाही. दिल्लीतलं वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सीएनजीची सुरुवात त्यांनी केली होती. दिल्लीतल्या प्रदूषणाची चिंता दीक्षित यांच्या मनात अखेरच्या क्षणापर्यंत राहिली. सार्वजनिक वाहनांसाठी दिल्ली पेट्रोल आणि डिझेलपासून मुक्त करण्यात आली. सीएनजीचा वापर केला गेला. दिल्ली सार्वजनिक परिवहन यंत्रणेत सीएनजीचं श्रेय हे शीला यांच्याकडेच जाते.

बातम्या आणखी आहेत...