आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोगी त्वचेसाठी आहारामध्ये या गोष्टींचा करा समावेश 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले सौंदर्य खुलवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या क्रीम लावत असालच, परंतु सोबतच आहाराकडेही लक्ष दिले जाणे गरजेचे ठरते. आपल्या आहारात या पाच पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास तुमची त्वचा निरोगी राहील. यामुळे रंगही उजळतो.

हळद : यामध्ये अँटिबॅक्टेरियल, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटिफंगल गुण असतात. तुम्ही सकाळी उठून कच्ची हळद खा. पर्याय म्हणून रात्री दुधात हळद उकळूनही पिऊ शकता. हे रोज पिल्याने तुमचा रंग गोरा होईल. हळद फेसपॅकमध्ये मिसळून लावणेही फायद्याचे आहे. याने डाग दूर होतात.

हिरव्या भाज्या : अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि भरपूर पोषक द्रव्ये असलेल्या हिरव्या भाज्या जसे पालक, भोपळा, दोडका, ब्रोकली आदींच्या सेवनाने त्वचेचा रंग पूर्णपणणे खुलतो. तुम्ही या भाज्या सलाड, सूप किंवा डाळीत मिसळून वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आहारात समाविष्ट करू शकता.

अॅव्होकॅडो : भरपूर व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट असलेल्या अॅव्होकॅडोमुळे त्वचा उजळते. यामुळे त्वचेवरील सूज कमी करण्यातही मदत मिळते. अॅव्होकॅडोमधील अँटिऑक्सिडंट्समुळे शरीरातील विषाक्त पदार्थ दूर होतात. तसेच यामुळे त्वचेला पोषण मिळते आणि वाढत्या वयाचा परिणाम चेहऱ्यावर दिसत नाही.

कोरफड : त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यात कोरफड सर्वात गुणकारी आहे. कोरफडीमधील ऑक्सिजन आणि जिबरेलिन सारख्या हार्मोन्समध्ये त्वचेला पोषण देणारे गुण असतात. कोरफडीचा रस त्वचेसाठी खूप फायद्याचा असतो. यासाठी ताज्या कोरफडीचा वापर करणे फायद्याचे ठरते.

बातम्या आणखी आहेत...