आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाय थंड पडणे, सूज येणे या समस्यांमुळे होऊ शकतात गंभीर आजार; याकडे दुर्लक्ष करू नका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पायांमध्ये होणारे त्रास जसे सूज किंवा वेदना याकडे दुर्लक्ष करू नका. याचा संबंध कित्येक गंभीर आजारांशी असू शकतो. यावर योग्य वेळी उपचार जरूर करा.


> पाय थंड पडणे 
जर तुमचे पाय थंड राहत असतील तर रक्तप्रवाह सुरळीत नाही हे याचे कारण असू शकते. ही समस्या उच्च रक्तदाब, धूम्रपान किंवा हृदयासंबंधीच्या आजारांमुळेदेखील होऊ शकते. जर कुणाला उच्च मधुमेह असेल तर या केसमध्ये नसांना दुखापत झाल्यामुळेही असे होऊ शकते.


> वेदना असेल तर 
जर पाय दुखत असतील तर तुम्ही याकडे दुर्लक्ष करू नका. हे दुखणे रक्ताचा प्रवाह सुरळीत नसल्यामुळे होऊ शकते. याशिवाय जर पायांमध्ये ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होत नसेल तरीदेखील पायांमध्ये दुखणे असू शकते. कित्येक वेळा मॅग्नेिशयमच्या कमतरतेमुळेदेखील पाय दुखू शकतात.


> सूज येणे 
सामान्यत: पायावर सूज गरोदरपणात येते, परंतु जर तुम्ही लांबचा प्रवास करून आला असाल तर किंवा पाय लोंबकळत ठेवून बसला असाल तर सूज येऊ शकते. कित्येक लोकांना जास्त वेळ उभे राहिल्यामुळे ही समस्या होऊ शकते. जास्त वेळ सूज राहिली तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

बातम्या आणखी आहेत...