आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुकन्या समृद्धी योजना

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

 टीम मधुरिमा   

सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हस्ते २२ जानेवारी २०१५ रोजी "मुलगी वाचवा मुलगी शिकवा' याअंतर्गत केली गेली. या योजनेत मुलींसाठी बचत खाते उघडवून देण्यात येते. या योजनेस सुकन्या समृद्धी खाते असेदेखील म्हटले जाते.


सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचा हस्ते २२ जानेवारी २०१५ रोजी “मुलगी वाचवा मुलगी शिकवा’ याअंतर्गत केली गेली. या योजनेत मुलींसाठी बचत खाते उघडून देण्यात येते. या योजनेस सुकन्या समृद्धी खाते असे देखील म्हटले जाते.
वयोगट १० वर्षांच्या कमी मुलींचे खाते पोस्ट ऑफिस, राष्ट्रीय बँक, अन्य एजन्सीमार्फत उघडले जाऊ शकते. आपल्या देशामधील असा वर्ग जो आपल्या मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी पैसे साठवून काही करण्यास इच्छुक आहे ते टपाल खाते किंवा इतर एजन्सीमार्फत कमीत कमी २५० रुपये जमा करून बचत खाते उघडू शकतात आणि जास्तच जास्त १.५ हजार रुपये जमा करून आपल्या लेकीचे भविष्य सुरक्षित करू शकतात.

या योजनेच्या सुरुवातीस ९.१ % अंतर वार्षिक दराने व्याज देण्यात आले होते. नंतर आता मुलींसाठी बचत राशीवर ८.६ % व्याज दर मिळते. सुकन्या समृद्धी योजना त्यांच्यासाठी फायदेशीर आहे, ज्यांचे उत्पन्न फार कमी आहे.

सुकन्या समृद्धी योजना २०२० चे उद्दिष्ट


सुकन्या समृद्धी योजनेचा उद्देश मुलींना शैक्षणिक क्षेत्रात पुढे करून त्यांच्या लग्नात कुठलीच कमतरता येऊ न देणे आहे. या योजनेमार्फत कमी उत्पन्नधारीच्या मुलीच्या शिक्षणास आणि लग्नासाठी लागणाऱ्या खर्चासाठी उपयोगी पडू शकते. ते आपल्या मुलीच्या नावाने  कमीत कमी २५० रुपयांनी बँकेत खाते उघडू शकतात. या योजनेमुळे मुलींना प्रोत्साहन मिळून त्या पुढे वाढतील. या योजनांचा मुख्य उद्देश मुलींच्या भ्रूणहत्येस रोखणे आहे.

नियम

  • या योजनेत मुलीच्या जन्मापासून ती दहा वर्षांची होईपर्यंत मुलीच्या नावावर हे खाते उघडता येते.
  • मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर जमा राशीमधून ५० % रक्कम आणि मुलीचे वय २१ वर्षाचे झाल्यास तसेच मुलीचे लग्न झाल्यास पूर्ण जमा राशी काढता येऊ शकते.
  • ह्यात जमा राशी आणि त्यावरील एजन्सीने जमा केलेली व्याज राशी असे मिळेल.
  • याची एकच अट आहे की ही जमा राशी मुलीच्या २१ व्या वर्षीनंतरच मिळेल.
  • सुकन्या समृद्धी योजनेमध्ये धन राशी जमा करण्याची पद्धत
  • या योजनेत नगदी धनराशी, डिमांड ड्राफ्टने जमा करता येते किंवा बँकेत कोअर बँकिंग सिस्टिमने पण हस्तांतरित (ट्रान्सफर) करता येते. नवे खाते उघडण्यासाठी खातेधारकाचे नाव द्यावे लागणार. यामुळे कोणीही आपल्या मुलीच्या खात्यात पैसे जमा करू शकेल.
  • कमीत कमी २५० रुपये या राशीने खाते उघडू शकतो.
  • ही केंद्र सरकारतर्फे राबवण्यात आलेली सर्वात लहान बचत योजना आहे.