आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीडीएसच्या बाबतीत ते सर्व, जे आपण जाणू इच्छिता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीडीएसची गरज का भासली ?, सीडीएसचे काम काय असेल ? सीडीएस कसे काम करेल ? याविषयी जाणून घ्या

जनरल बिपिन रावत देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) झाले आहेत. सोमवारी रात्री उशिरा सरकारने ही घोषणा केली.  विशेष म्हणजे सीडीएसच्या माध्यमातून अण्वस्त्र अधिकारात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहील. अण्वस्त्राची कळ दाबण्याबाबत ते पंतप्रधान मुख्य लष्करी सल्लागार राहतील. २००३ मध्ये स्थापन अण्वस्त्र अधिकार प्राधिकरण (एनसीए) मध्ये १६ वर्षांनंतर हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 

सीडीएसच्या बाबतीत ते सर्व, जे आपण जाणू इच्छिता 
 

> सीडीएसची गरज का भासली ?
तिन्ही दलांत एक विचार-एक दिशा-एक युद्ध हा विचार राहावा. कारगिल युद्धानंतर सीडीएस बनवण्याची शिफारस झाली होती. सरकारने १७ जुलै २००४, ४ ऑगस्ट २००५, १० ऑगस्ट २००६, २० आॅक्टोबर २००८ आणि १८ मार्च २०१३ ला संसदेत सीडीएसच्या नियुक्तीचे आश्वासन दिले होते. पंतप्रधान मोदी यांनी १५ ऑगस्टला त्याची घोषणा केली होती. > सीडीएसचे काम काय असेल ?
याचे तीन प्रमुख उद्देश आहेत. पहिला- प्रशिक्षण, खरेदी, स्टाफ आणि ऑपरेशन्सना योग्य दिशा देणे. दुसरा- राजकीय नेतृत्वाच्या लष्करी सल्ल्याचा दर्जा सुधारणे, तिसरा- लष्करी बाबीत वैविध्य आणणे > सीडीएस कसे काम करेल ? 
संरक्षण मंत्रालयात नवा विभाग असेल. त्याचे नाव लष्करी व्यवहार विभाग असेल.

बातम्या आणखी आहेत...