आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मशिदीतील भोंग्यातून दिली हिंदु व्यक्तीच्या निधनाची माहिती; अशी माहिती देण्याची बहुतेक ही पहिलीच घटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलकापूर पांग्रा  - आजच्या या युगामध्ये समजा-समाजात जातीय तेढ निर्माण करणारे व त्यातून होणाऱ्या फायद्यासाठी मलिदा लाटणारे बरीच उदाहरण आहेत. काही ठिकाणी गुलाल टाकल्या वरून तर काही ठिकाणी हिरव्या रंगावरून दोन जाती मध्ये दंगली घडणाऱ्या घटना घडत आहेत. परंतु मलकापूर पांग्रा हे गाव नेहमीच अश्या घटनांना अपवाद आहे. विशेष म्हणजे या गावा मध्ये हिंदू, मुस्लिम, बौद्ध अशा विविध जाती धर्माची लोक मोठ्या गुण्या गोविंदाने नांदत आहेत. आजपर्यंत या गावात एकही जातीय दंगलीची नोंद शासन दरबारी नाही. 


मलकापूर पांग्रा हे गाव एकतेचे प्रतीक म्हणून ओळखले जात आहे. या गावात कोणतीही जयंती असो किंवा गणपती उत्सव असो मुस्लिम बांधव गणेश मूर्तीवर फुलांचा वर्षाव करतात. तर मोहरम मध्ये हिंदू बांधव ताजियावर फुलांचा वर्षाव करतात. गावात एखाद्या मुस्लिम बांधवांचे निधन झाल्यास त्यांच्या निधनाची वार्ता आणि अंत्यसंस्काराची वेळ मस्जितच्या लाऊडस्पीकरच्या माध्यमातून सांगितले जाते. दरम्यान, काल रविवारी २८ जुलै रोजी मस्जितच्या लाउडस्पीकर वरून चक्क हिंदू बांधवाच्या निधनाची बातमी सर्वांना ऐकायला मिळाली. मारवाडी समाजातील प्रतिष्ठित व्यापारी सुरेश उर्फ गेंदू सेठ यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता व अंत्यसंस्काराची वेळ मौलवीने मस्जितच्या लाउडस्पीकर सांगून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. सुरेश मदनलाल दायमा उर्फ गेंदू सेठ यांचे काल २८ जुलै रोजी अल्पशा आजाराने औरंगाबाद येथे निधन झाले होते. त्यांच्या घरासमोरून मौलवी मन्सूर मामू हे दुपारची अजाण देण्यासाठी मस्जिद कडे जात होते. त्यांना निधनाची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी माहिती जाणून घेत थेट मस्जितचा रस्ता धरला. मस्जिद मध्ये जाऊन त्यांनी लाउडस्पीकर मध्ये गेंदू सेठ यांच्या निधनाची वार्ता सांगितली. हिंदू समाजाच्या व्यक्ती च्या निधनाची माहिती मस्जिद मधून सांगण्याची बहुतेक ही पहिलीच घटना असावी. 
 

बातम्या आणखी आहेत...