आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी.एन.शेषन... दरारा इतका की, ‘अल-शेषन’ म्हणत; 'आय इट पॉलिटिशियन्स फॉर ब्रेकफास्ट' हे वाक्य चर्चेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भास्कर रिसर्च - १९५५ मध्ये एक हुशार तरुण नागरी सेवेच्या परीक्षेत पहिला आला हाेता. त्या तरुणाचे नाव हाेते तिरुनेल्लई नारायण अय्यर शेषन, ज्यांना आपण टी.एन.शेषन नावाने ओळखताे. त्यांनीच देशाला पहिल्यांदा निवडणूक आयोगाच्या ताकदीची जाणीव करून दिली. भारतीय राजकारणी केवळ दोन जणांना घाबरतात. त्यात पहिले- ईश्वर व दुसरे- शेषन. देशाचे दहावे मुख्य निवडणूक आयुक्त बनण्यापूर्वी शेषन यांनी ज्या मंत्रालयात काम केले, त्या मंत्र्यांची प्रतिमा आपाेआप सुधारली. १९९० मध्ये मुख्य आयुक्त बनल्यानंतर त्यांचे ‘आय इट पॉलिटिशियन्स फॉर ब्रेकफास्ट’ हे वाक्य खूप चर्चेत राहिले. त्यांनी कामातही असाच कठाेरपणा दाखवला. त्यामुळे शेषन यांना ‘अल-कायदा’वरून ‘अल-शेषन’ म्हटले जाऊ लागले.

 

मुख्य निवडणूक आयुक्त बनण्यापूर्वी

> शेषन यांनी दोन वर्षे चेन्नईत परिवहन आयुक्तपद सांभाळले. यादरम्यान एक चालक त्यांना म्हणाला की, तुम्हाला बसच्या इंजिनाची माहिती नाही, बस चालवता येत नाही; मग चालकांच्या समस्या काय समजणार? त्यावर शेषन केवळ बस चालवणेच शिकले नाहीत, तर वर्कशॉपचा अनुभवही घेतला. त्यानंतर मी बसचे इंजिन काढून पुन्हा फिट करू शकताे, असा दावा केला. एकदा त्यांनी प्रवासी भरलेली बस स्वत: ८० किमीपर्यंत चालवली हाेती.

 

 

आयोगाची जबाबदारी मिळाल्यानंतरचे तीन किस्से

1) गुन्हेगारांना म्हणाले-अटकपूर्व जामीन घ्या
> १९९२ च्या उत्तर प्रदेश निवडणुकीत त्यांनी  जिल्हा दंडाधिकारी, पाेलिस अधिकारी व २८० पर्यवेक्षकांना एकही चूक सहन केली जाणार नसल्याची तंबी देऊन टाकली हाेती. वृत्तपत्रांतील काही बातम्यांनुसार त्या वेळी एका रिटर्निंग अधिकाऱ्याने सांगितले हाेते की, आम्ही एका दयाहीन व्यक्तीच्या दयेवर अवलंबून आहाेत.’ शेषन यांनी केवळ यूपीमध्येच सुमारे ५०,००० गुन्हेगारांना अटकपूर्व जामीन वा अटक करवून घेण्याचे स्पष्टपणे बजावले हाेते. 

 

2) म्हणाले- ९५ नंतर एकही निवडणूक हाेणार नाही
> निवडणुकीत ओळखपत्राचा वापर शेषन यांच्यामुळेच सुरू झाला. प्रारंभी भारतात असा खर्चीक प्रकार शक्य नसल्याचे सांगून काही नेत्यांनी विराेध केला असता, शेषन यांनी मतदार ओळखपत्र बनवले नाहीत तर देशात १९९५ नंतर एकही निवडणूक हाेणार नाही, असे बजावले. तसेच केवळ ओळखपत्रे तयार नसल्यामुळे अनेक राज्यांतील निवडणुका स्थगित करण्यात आल्या हाेत्या.

 

3) राज्यपालांना साेडले नाही, मग मंत्री तर दूरच...
> १९९३ मध्ये हिमाचल प्रदेशचे तत्कालीन राज्यपाल गुलशेर अहमद हे मुलाच्या प्रचारार्थ सतनात आले हाेते. वृत्तपत्रांत याची छायाचित्रे प्रकाशित झाली व गुलशेर यांना पद साेडावे लागले. लालूप्रसाद यादवांना त्यांच्या जीवनात सर्वात जास्त शेषन यांनीच त्रस्त केले. १९९५ची बिहारमधील निवडणूक ऐतिहासिक ठरली. लालू हे शेषन यांच्यावर सडकून टीका करायचे. म्हणायचे- शेषन यांना म्हशीवर बसवून गंगेत बुडवून टाकू. तेथे ४ टप्प्यांत निवडणुकीची घाेषणा झाली व चारदा तारखा बदलल्या गेल्या.

 

आठ भाषांचे जाणकार

टी.एन.शेषन यांचे शिक्षण केरळमध्ये झाले. तेथे ‘तलायम’ बोलली जायची. तामिळ-मल्याळम मिळून बनलेली भाषा.  येथूनच त्यांचे विविध भाषा शिकणे सुरू झाले. त्यांना हिंदी, इंग्रजीशिवाय तामिळ, मल्याळम, संस्कृत, कन्नड, मराठी व गुजराती भाषा ज्ञात होत्या.

बातम्या आणखी आहेत...